आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फॉरेन्सिक'चे पोलिसांना धडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्यशाळेत फॉरेन्सिक विभागाचे उपसंचालक विजय ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. - Divya Marathi
कार्यशाळेत फॉरेन्सिक विभागाचे उपसंचालक विजय ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अमरावती - गुन्हेगारांनाशिक्षा कशी होईल, पुरावे गोळा करण्यासाठी काय काय करावे आणि पुरावा गोळा करताना कुठल्या बाबींचा विचार करण्यात यावा, यासंदर्भात फॉरेन्सिक विभागाचे उपसंचालक विजय ठाकरे यांनी पोलिसांना धडे दिले. फॉरेन्सिक विभाग अमरावती ग्रामीण पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (दि. २८) वसंत हॉल येथे विशेष तपास युनिट विभागाच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
विभागातील प्रत्येक पोलिस ठाण्यातील विशेष तपास युनिट विभागाचे जवळपास दीडशेहून अधिक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, दोन सत्रात ही कार्यशाळा घेण्यात आली. अकरा ते दुपारी दीड असे पहिले सत्र झाले, तर जेवणानंतर दुपारी अडीच ते साडेचार असे दुसरे सत्र घेण्यात आले. तपास करताना पोलिसांच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने ठाकरे यांनी प्रोजेक्टरसह प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून उपस्थितांना माहिती दिली. या वेळी पाचही जिल्ह्यांतून आलेले अधिकारी कर्मचारी यांनी बारीकसारीक बाबींकडे लक्ष देऊन तपासासाठी उपयोगी पडणाऱ्या गोष्टींकडे लक्ष दिले. तपासासाठी पूर्वीपासून चालत आलेल्या जुनाट पद्धतीला मागे टाकत आधुनिक कौशल्याचा उपयोग करून कसा तपास करावा, याचे धडे ठाकरे यांनी पोलिसांना दिले. ग्रामीण पोलिस अधीक्षक लखमी गौतम यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी दिनकर कदम यांनी हा कार्यक्रम घेतला. या वेळी एपीआय विजय आढाव, सतीश जाधव आणि पाचही जिल्ह्यांतून आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सभागृह तुडुंब भरले होते. या कार्यशाळेत तज्ज्ञांनी दिलेल्या धड्यांमुळे पोलिस तपासाला गती मिळणार आहे.
कार्यशाळेचा फायदा काय? :
कुठलाहीएखादा गुन्हा घडला की, बहुतांश वेळा गुन्हेगाराची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता होते. परंतु, प्रत्यक्षात तो गुन्ह्यामध्ये सहभागी असतो. तसे पुरावेही त्याच्या बाजूने असतात, परंतु पोलिसांना कधी कधी हे बारकावे दिसत नाही. या कार्यशाळेमुळे पोलिसांच्या ज्ञानात भर पडणार आहे. कुठे कशा पद्धतीने पुरावा कामी येईल, पुरावा प्राप्त करण्यासाठी काय करावे लागले, याचे धडे ठाकरे यांनी पोलिसांना दिले. या कार्यशाळेमुळे पोलिसांना नक्कीच तपास करताना फायदा होणार असल्याचे कार्यशाळेला उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले.