आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणेदारांना एसपींच्या, पोलिसांना ठाणेदारांच्या बदलीचे वेध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्हा पोलिस अधीक्षकांना जिल्ह्यात दोन वर्ष पूर्ण झाल्यापासून जिल्ह्यातील ठाणेदार तथा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या बदलीची घाई झाली आहे, तर पोलिस कर्मचाऱ्यांना ठाणेदारांच्या बदलीचे वेध लागले आहेत. याचा परिणाम पोलिसांच्या प्रत्यक्ष कामावर दिसून येत आहे.
नॉन करप्ट अधिकारी अशी प्रतिमा असलेल्या जिल्हा पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी सुरुवातीपासूनच पोलिस अधिकाऱ्यांच्या नाड्या दाबल्या आहेत. त्यामुळे पोलिस अधिकाऱ्यांच्या ‘हम करे सो..’ ला लगाम लागला आहे. बदलीतील दोन वर्ष कसेतरी काढायचे म्हणून पोलिस अधिकाऱ्यांनी दोन वर्ष कळ काढली. मात्र, जिल्हा पोलिस अधीक्षकांची बदलीच होत नसल्याने पोलिस अधिकारी हताश झाल्याचे दिसून आहे. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या कामाची पद्धत पाहता सत्ताधारी पक्ष त्यांच्या बदलीला अनुकूल नाही. त्याचप्रमाणे पोलिस कर्मचारीसुद्धा येथील ठाणेदारांच्या कार्यशैलीला त्रस्त झालेेत. आधीपासूनची सवय दोन वर्षात जाणे शक्य नसल्यामुळे पोलिसांवरही टाच आल्याने त्यांच्या बोलण्यातून जाणवत आहे. मात्र, दोन वर्षांच्या काळातील गुन्हेगारीचा आलेख पाहता गुन्हेगारांच्या हालचाली थांबल्या आहेत.

गुन्हे दोष सिद्धीत वाढ : संपूर्णजिल्ह्यामध्ये घडणारे गुन्हे गुन्ह्यात आरोपींना शिक्षा होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यासाठी पैरवी अधिकारी पोलिसांना वेळोवेळी मार्गदर्शन होत असल्यामुळे तपास योग्य पद्धतीने होत असून, गुन्हेदोष सिद्धीचे प्रमाण वाढले आहे.

चेन स्नॅकिंगच्या घटनेची प्रचंड चिड : शहरातचेन स्नॅकिंगच्या घटना घडूच नयेत, अशी ताकीद मीणा यांनी प्रत्येक प्रभारी पोलिस अधिकाऱ्यांना दिली. पोलिसांच्या अपुऱ्या गस्तीमुळेच अशा घटना घडत असल्यामुळे नाकाबंदी, गस्तीची ताकीद पोलिसांना दिली आहे.

पोलिसिंगमध्ये झाले मोठे बदल : जिल्ह्यातीलपोलिसिंग बदललेली दिसून येते. दिवसाची नाकेबंदी, रात्रीची गस्त प्रभावीपणे राबवण्यात येतेे. ठाण्यात प्रत्येकाची तक्रार घेण्याचे आदेशीत असून, कारभार पारदर्शी व्हावा म्हणून ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे जनतेच्या हिताच्या बाबी राबवल्या.

अनेक अधिकारी बदल्यांच्या जुगाडमध्ये
जिल्ह्यात नोकरी करताना पारदर्शीपणा आड येत असल्यामुळे अनेक अधिकारी बदलीच्या जुगाडमध्ये आहेत, तर ज्यांची जिल्ह्यात बदली झाली आहे, असे अधिकारी जिल्ह्यात येण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...