आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण: शिवसेनेचे अांदाेलन, भाजपची पक्ष बांधणी; निवडणूक स्वबळावर पेरणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- शिवसेना अांदाेलनाच्या माध्यमातून तर भाजप पक्ष बांधणीच्या निमित्ताने अागामी जिल्हा परिषद त्यानंतर हाेणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी पेरणी करणार अाहे. शिवसेना विधानसभा मतदारसंघ निहाय शेतकरी कर्जमुक्तीसाठी अांदाेलन करणार असून, पहिला माेर्चा मे राेजी बाळापूर येथे काढण्यात येणार अाहे. अांदाेलनाची दिशा ठरवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या राजकारणात सक्रिय असलेल्या सेना पदाधिकाऱ्यांची शनिवारी चर्चाही झाली. दाेन्ही निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी भाजप शिवसेनेने तयारी सुरु केली अाहे. काँग्रेस, राष्ट्रवादी भारिप-बमसंमध्ये अालेली मरगळ अशीच कायम राहिल्यास निवडणुकीत खरी लढत भाजप शिवसेनेत हाेईल, असे मत राजकीय जाणकारांमधून व्यक्त हाेत अाहे. 

महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भविष्यात निवडणुका स्वबळावर लढण्याची घाेषणा केली हाेती. त्यामुळे अकाेला जिल्ह्यात शिवसेनेला प्रथम भाजपलाच टक्कर द्यावी लागणार अाहे. जिल्ह्यात सध्या राजकीयदृष्ट्या भाजप दिवसेंदिवस सक्षम हाेत अाहे. 

लाेकसभा निवडणुकीत महायुतीमधील घटक पक्षांना साेबत घेत भाजपने तिसऱ्यांदा कमळ फुलले हाेते. मात्र, त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेने काडीमाेड घेतला. जिल्ह्यातील पाच पैकी चार जागांवर भाजपने झेंडा फडकवला. गतवर्षी झालेल्या नगराध्यक्ष नगर परिषद निवडणुकीत तीन ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून अाले, शिवसेनेला एकाही ठिकाणी सत्ता स्थापन करता अाली नाही. त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला ८० पैकी जागांवर समाधान मानावे लागले. तब्बल ४८ जागा जिंकत भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली. त्यामुळे अाता अागामी निवडणुकीत दमदार कामगिरीसाठी शिवसेनेला मजबूत पक्ष बांधणी करावी लागणार अाहे. 

जिल्हापरिषदमध्येही भाजपच वरचढ: जिल्हापरिषदमध्येही शिवसेना भाजपच्या तुलनेने कमकुवत अाहे. भाजपचे १२, तर शिवसेनेचे सध्या सदस्य अाहेत. पूर्वी ही संख्या हाेती. मात्र, जून महिन्यात झालेल्या अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे चंद्रशेखर पांडे माधुरी गावंडे या दाेन सदस्यांनी महाअाघाडीतील उमेदवारांना मत दिल्याने त्यांना पक्षातून निलंबित केले. त्यानंतर अपक्ष सदस्य नितीन देशमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांना जिल्हाप्रमुखही केले. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भरीव कामगिरीसाठी शिवसेनेला ग्रामीण भागातील मतदारांना अाकर्षित करावे लागणार अाहे. 

असे हाेईल अांदाेलन...
शिवसेनेतर्फेलवकरच शेतकऱ्याच्या विविध प्रश्नांवरून विधानसभा मतदारसंघनिहाय अांदाेलन करण्यात येणार अाहे. या अांदाेलनाची मुख्य जबाबदारी संभाव्य उमेदवारांवरच राहणार अाहे. हे अांदाेलन अकाेल्यात दाेन ठिकाणी, मूर्तिजापूर, बाळापूर अकाेट येथे हाेणार अाहे. एका माेर्चात १० हजार शेतकरी, शिवसैनिक सहभागी, या दृष्टीकाेनातून सेना नेत्यांनी नियाेजन केले अाहे. अांदाेलनाच्या निमित्ताने शाखा प्रमुख ते तालुका शहर प्रमुखांच्या बैठका घेण्यात येणार असून, पक्ष बांधणी करण्यात येणार अाहे. जिल्हा परिषद सर्कलवरही लक्ष केंद्रित करण्यात येणार असून, माेर्चामध्ये सर्कलमधून शेतकरी, शिवसैनिकांच्या सहभागाची जबाबदारी संभाव्य उमेदवाराला देण्यात येणार अाहे. या अांदाेलनाच्या माध्यमातून हाेणाऱ्या शक्ति प्रदर्शनाचा फायदा पक्षाला निवडणुकीत हाेईल, असा विश्वास सेना नेत्यांना अाहे. 

भाजप १७ हजार कार्यकर्त्यांची फाैज उभारणार...
भाजपने गुरुवारी बाळापूर मतदार संघातील ३०६ बूथ प्रमुखांची यादी जिल्हा प्रशासनाकडे दाखल केली. ओळखपत्र वितरणाच्या कार्यक्रमाला खासदार धाेत्रे, भाजप जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, उप विभागीय अधिकारी डॉ. संजय खडसे यांच्यासह भाजपचे नेते उपस्थित हाेते. अकोला लोकसभा मतदार संघात १०० टक्के बुथ प्रमुखांच्या निवडीसह प्रत्यक्ष निवडणुकीसाठी १७००० कार्यकर्त्यांची फौज भाजप उभी करणार अाहे. 

गड जिंकणे कठिण 
जिल्ह्यात अागामी निवडणुका जिंकणे शिवसेनेला साेपे नाही. शिवसेनेच्या तुलनेने भाजपला कमी परिश्रम घ्यावे लागणार असल्याचे विधानसभा निवडणुकीत दाेन्ही पक्षांना मिळालेल्या अाकडेवारीवर नजर टाकल्यास दिसून येते. अकाेला पश्चिममध्ये भाजपला ६६,९३४ तर शिवसेनेला १०,५७२ मते मिळाली हाेती. अकाेला पूर्व मतदारसंघात भाजपला ५३,६७८, तर शिवसेनेला ३५,५०४ मते मिळाली हाेती. त्यामुळे शहर ग्रामीण भागातही शिवसेनेला कंबर कसावी लागणार अाहे. 

बाळापूर बनले केंद्र 
भाजपचा सध्या विधानसभेच्या बाळापूर मतदारसंघावर झेंडा नाही. २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत बाळापूर महायुतीमधील शिवसंग्रामने उमेदवार रिंगणात उतरवला हाेता. अशातच माजी अामदार नारायणराव गव्हाणकरही लढले. परिणामी मतांचे विभाजन झाले भाजपचा पराभव झाला हाेता. त्यामुळे अाता भाजपने या मतदारसंघासाठी अातापासून कंबर कसली असून, शिवसेनाही बाळापूर येथूनच अांदाेनलाची सुरुवात करून शक्ति प्रर्दशन करणार अाहे. 
बातम्या आणखी आहेत...