आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महानगराध्यक्षांचे पदग्रहण थाटात, शांतता विराेधी गटात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- नवनिर्वाचित काँग्रेस महानगराध्यक्ष बबनराव चाैधरी यांचा पदग्रहण साेहळा बुधवारी स्वराज्य भवनात थाटात पार पडला. निवडीला विराेध करण्यासाठी पदग्रहणाच्या दिवसापासून स्वराज्य भवन परिसरात उपाेषण करण्याची वल्गना करणारे फिरकलेही नाहीत. एकीकडे साेहळा थाटात सुरू असतानाच विराेधी गटात मात्र कमालीची शांतता हाेती.

गत अाठवड्यात प्रदेश काँग्रेसने राज्यातील काही महानगराध्यक्षांच्या नावांची घाेषणा केली. अकाेला महानगराध्यक्षपदी माजी अामदार बबनराव चाैधरी यांची निवड करण्यात अाली. काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांनी मात्र निवडीचा निषेध करत प्रदेशाध्यक्षांना पत्रच दिले. ईदनंतर पदग्रहण साेहळा अायाेजित करण्याचे नियाेजन करण्यात अाले. मात्र, अचानक कार्यक्रमात बदल करत बुधवारीच पदग्रहण साेहळा पार पडला. कार्यक्रमाला प्रामुख्याने नवनिर्वाचित बबनराव चाैधरी, माजी अामदार नातिकाेद्दीन खतीब, माजी महापाैर मदन भरगड, बाबाराव विखे, सुधीर ढाेणे, श्रावण इंगळे, महेंद्रसिंग सलुजा, स्वाती देशमुख, सुषमा निचळ, राजाभाऊ देशमुख, महेबूब खान महेमूद खान, निखिलेश दिवेकर, प्रदीप वखारिया, अब्दुल जब्बार, महेश गणगणे, राजेश पाटील अादी प्रामुख्याने उपस्थित हाेते. संचालन कपिल रावदेव यांनी केले.

विराेधकांचा समाचार : पक्षविराेधीकाम करणाऱ्यांना बाजूला सारा, असे अावाहन विष्णू मेहरे यांनी केले. माझ्यावरही उमेदवारीवरून अन्याय झाला, मात्र मी पक्ष निर्णयाच्या विराेधात काम केले नाही, असे मदन भरगड यांनी सांगितले. अकाेलावासीय मूलभूत सुविधांपासून वंचित असून, सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या विराेधात अांदाेलन करण्याचे अावाहनही त्यांनी केले.

रविवारपासूनउपाेषण : काँग्रेसमहानगराध्यक्ष निवडीच्या विराेधात रविवारपासून स्वराज्य भवन परिसरातील अाबासाहेब खेडकर यांच्या पुतळ्याच्या चरणी उपाेषण करण्यात येणार अाहे. निवड रद्द हाेण्यासाठी प्रसंगी मुंबई दिल्लीतही अांदाेलन करण्यात येईल, असे काॅग्रेसचे महासचिव राजेश भारती यांनी सांगितले.
महापालिकेच्या नगरसेवकांची पाठ
साेहळ्याला काँग्रेसच्या १९ पैकी चार नगरसेवक उपस्थित हाेते. सहा महिन्यांवर येऊन ठेपलेल्या मनपा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर महानगराध्यक्षांची निवड चुकली असल्याचा अाराेप यापूर्वीच दुसऱ्या फळीतील नेत्यांनी केला हाेता. या पृष्ठभूमीवर साेहळ्याला नगरसेवकांनी फिरवलेली पाठ ही चर्चेचा विषय बनला अाहे.

गटबाजी राहणार नाही : बबनराव चाैधरी
काँग्रेसमध्ये गटबाजी राहणार नसून, नाराज पदाधिकारी, कार्यकर्त्यांची समजूत काढून, त्यांना विश्वासात घेऊन पक्षवाढीसाठी प्रयत्न करू, असे नवनिर्वाचित महानगराध्यक्ष चाैधरी साेहळ्यात म्हणाले. मनपा निवडणुकीत निवडून येणाऱ्यांना उमेदवारी देेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विराेध करणारेही साेहळ्यात हजर
महानगराध्यक्ष निवडीला विराेध करणारे पत्र प्रदेशाध्यक्षांना सादर करणारे चार पदाधिकारी साेहळ्याला हजर हाेते. या चार पदाधिकाऱ्यांनी त्यांचेही स्वागत करण्यात अाले. हे चारही जण व्यासपीठावर हाेते, हे येथे उल्लेखनीय.
बातम्या आणखी आहेत...