आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुंदोपसुंदी पुन्हा एकदा अाली सर्वांसमाेर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - केंद्रशासनाच्या नोट बंदीबाबत तीव्र भूमिका घेऊन रस्त्यावर उतरण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी घेतला. नऊ जानेवारीला राज्यभर आंदोलने, रास्ता रोको केले जाणार आहे. या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी दोन जानेवारीला बैठक घेऊन कार्यकर्त्यांना आंदोलनाच्या भूमिकेबाबत माहिती दिली. त्यामुळे आता केवळ तयारीच्या अनुषंगाने बैठक घेणे गरजेचे असताना याच विषयावर महानगराध्यक्ष अजय तापडीया यांनी सहा जानेवारीला बैठक घेतली. परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस मधील संदोपसुंदी पुन्हा एकदा समोर आली. 
 
२०१२ मध्ये झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत केवळ पाच जागा जिंकणाऱ्या राष्ट्रवादी कॉग्रेसची आता ताकद वाढत आहे. एकीकडे ताकद वाढत असताना दुसरीकडे गटबाजीही सुरु आहे. महापालिका निवडणुकीवर आपलेच वर्चस्व असावे, यासाठी ही लढाई सुरु आहे. 
यापूर्वीही राष्ट्रवादी कॉग्रेसच्या काही माजी पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन समन्वयकाची नियुक्ती केली होती. ही नियुक्ती करुन राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये समन्वय नसल्याची बाबच या नियुक्तीमुळे स्पष्ट झाली होती. जशी-जशी निवडणुक जवळ येत आहे. तसा-तसा पक्षावर आणि उमेदवारी वाटपावर आपले वर्चस्व राहावे, यासाठी राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये स्पर्धा लागली आहे. 
आताही नऊ जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनाच्या अनुषंगाने जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांनी बैठक घेऊन आंदोलनाची माहिती दिली. आंदोलना बाबत बैठक झाल्या नंतर केवळ फॉलोअप शिल्लक राहातो. 
 
मात्र तरीही महानगर शाखेचे अस्तित्व दाखवण्यासाठी महानगराध्यक्षांसह काही नेत्यांनी सहा जानेवारीला पक्ष कार्यालयात आंदोलनाच्या अनुषंगाने बैठक बोलावली आहे. त्यामुळे एकाच विषयावर एकाच शहरात दोन ठिकाणी बैठक कशासाठी ? असा प्रश्न निर्माण झाला असून यामुळेच या बैठकीतून राष्ट्रवादी कॉग्रेस मधील संदोपसुंदी स्पष्ट होत आहे. 

अनेकांनी फिरवली बैठकीकडे पाठ 
राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये नव्यानेच प्रवेश घेतलेल्या दहा नगरसेवकांसह काही माजी नगरसेवक, माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी सहा जानेवारीला झालेल्या बैठकीकडे पाठ फिरवली आहे. हे सर्वजण महानगर शाखेशीच निगडीत आहेत. अनेकांनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याने पक्षातील गटबाजीही सिद्ध झाली आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...