आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काँग्रेस म्हणते, सर्व पर्याय खुले; महाअाघाडीमध्ये बिघाडीचे संकेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- झेडपीत सत्ता स्थापनेसाठी तयार करण्यात अालेल्या महाअाघाडीत सभापती निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर बिघाडी हाेण्याचे संकेत प्राप्त झाले अाहेत. काँग्रेस नेत्यांनी सर्वच पर्याय खुले असल्याचे स्पष्ट केले अाहेत. अाता शिवसेना-भाजप, अपक्षांचा सहभाग असलेल्या महाघाडीत केवळ एकच उमेदवार अपक्ष राहिल्याने सभापतीच्या निवडणुकीत महाघाडीच्या उमेदवारांना मतदान करायचे की तटस्थ राहायचे, हे काँग्रेसने अद्याप स्पष्ट केलेे नाही.

जि.प. अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयीश्री खेचून अाणण्यासाठी शिवसेना,भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी अपक्षांची महाअाघाडी तयार करण्यात अाली. मात्र, शिवसेना, राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एका सदस्याने भारिप-बमसंच्या उमेदवारांना मतदान केले हाेते. शिवसेनेचा एक सदस्य तटस्थ राहिला हाेता. महाअाघाडीचे उमेदवार पराभूत झाले हाेते. १३ जून राेजी हाेणाऱ्या सभापतिपदाच्या चारही जागांसाठी निवडणूक हाेणार असून, िवजयीश्री खेचून अाणण्यासाठी भारिप-बमसं महाअाघाडीने कंबर कसली अाहे.

...तरमहाआघाडीची नव्हे, युती : जिल्हापरिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेचे उमेदवार रिंगणात नव्हते. परिणामी काँग्रेसने अाम्ही महाआघाडीच्या अर्थात शिवसेना-भाजपच्या नव्हे, तर अपक्षांना मतदान केले अशी साेयीची भूमिका घेतली हाेती. मात्र, अाता महाआघाडीकडून अध्यक्षपदाची निवडणूक लढवलेले नितीन देशमुख शिवसेनेत दाखल झाल्याने अाघाडीत तांत्रिकदृष्ट्या केवळ एकच अपक्ष अाहे. काँग्रेस सभापतिपदाच्या निवडणुकीत भाजप-शिवसेनेच्या सदस्यांना मतदान करेल की नाही, हे येणाऱ्या काळात स्पष्ट हाेईल. काँग्रेस तटस्थ राहिल्यास किंवा भारिप-बमसंला पाठिंबा दिल्यास महाअाघाडी नव्हे, तर शिवसेना-भाजप युती असे चित्र दिसणार अाहे.

...तरमहाआघाडीचे संख्या बळ १९ : अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्यािनवडणुकीत महाआघाडीच्या सदस्यांना २३ मते मिळाली हाेती. यामध्ये भाजप-१२, शिवसेना-६, अपक्ष-१ काँग्रेसच्या सदस्यांचा समावेश हाेता. अाता काँग्रेसने महाआघाडीची साथ साेडल्यास महाघाडीचे संख्या बळ हे १९ वर येईल.
अनेक याेजना रखडल्या असून, गरजू याेजनांपासून वंचित अाहेत. त्यामुळे यापूर्वी भारिप-बमसंसाेबत सत्तेत सहभागी असलेले काँग्रेस सदस्यही असमाधानी अाहेत. परिणामी, सत्ता परिवर्तन अावश्यक अाहे. याबाबतची निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील.'' नितीनदेशमुख, जि.प.सदस्य, तथा उपजिल्हाप्रमुख शिवसेना.

पर्याय खुले
जि.प.अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने भाजप-शिवसेना नव्हे, तर अपक्ष उमेदवारांना मतदान केले हाेते. सभापतिपदाच्या निवडीसाठीही काँग्रेसपुढे सर्वच पर्याय खुले अाहेत.'' हिदायतपटेल, जिल्हाध्यक्ष काँग्रेस.
बातम्या आणखी आहेत...