आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजप, काँग्रेस उमेदवारांपुढे पक्षाअंतर्गत गटातटाचे अाव्हान, हेव्यादाव्यांचा फायदा मिळवण्यासाठी प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला- अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघातच्या निवडणुकीत यंदा प्रथमच थेट राजकीय पक्षांनी उडी घेतली असून, भाजप काँग्रेसमध्ये अंतर्गतच घमासान हाेण्याची शक्यता राजकीय जाणकारांमधून व्यक्त हाेत अाहे. भाजपनंतर अाता काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांनी संवाद साधण्यास प्रारंभ केला अाहे. अशातच काही संभाव्य उमेदवारांनी अाता विराेधी उमेदवारांच्या पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत धुसफुस, हेवेदाव्यांचा फायदा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू करून कंबर कसली अाहे.

राज्यात प्रथमच भाजपचा मुख्यमंत्री झाल्याने पक्षाने भविष्यात हाेणाऱ्या सर्वच निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी कंबर कसली अाहे. अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत यापूर्वी थेट राजकीय पक्ष उडी घेत नव्हते. शिक्षक संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक विद्यार्थी संघटनांच्या पाठिंब्याने उमेदवार रिंगणात उतरत हाेते. अनेक उमेदवार तर चार-पाच वर्षे मतदाराला त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा पत्र पाठवून त्यांच्या संपर्कात अाहेत. यंदाच्या निवडणुकीत रिंगणात उतरण्यासाठी संभाव्य उमेदवार एक वर्षांपासून संपर्क अभियान राबवत अाहे.

निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची : पदवीधरमतदारसंघातून भाजपने पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील यांना उमेदवारी जाहीर केली अाहे. अनेक दिवसांपासूनडाॅ. पाटील यांनी संपर्क अभियान सुरु अाहे. गत अावड्यात त्यांनी अकाेला शहरातील विविध भागांमध्ये जाऊन पदवीधरांशी संवादही साधला. डाॅ. पाटील अािण खासदार संजय धाेत्रे धाेत्रे यांच्या गटातील समजले जाणारे अामदार रणधीर सावरकर अामदार गाेवर्धन शर्मा यांच्यामधील सख्य जगजाहीरच अाहे. दाेन गट एकमेकांवर कुरुघाेडी अथवा टाेमणे मारण्याची एकही संधी साेडत नाही. ‘मीच एकटाच विकास करताे, असे काेणी मानू नये’ असा टाेला खासदार धाेत्रेंनी जुलै राेजी पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या जिल्हा नियाेजन समितीच्या सभेत लगावला हाेता. अामची केवळ अडचणीच्या वेळीच अाठवण येते. अाम्हाला काेणीच गृहित धरु नये, असे सांगण्यासही धाेत्रे विसरले नव्हते. अाता मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी असलेले राज्यमंत्री डाॅ. पाटील हेच पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवार असल्याने भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात अाहे. या निवडणुकीत खासदार धाेत्रे गट पालकमंत्री डाॅ. पाटील यांना कितपत सहकार्य करेल, हे येणाऱ्या काळात स्पष्ट हाेईलच.

पदवीधर मतांची विभागणी निर्णायक ठरण्याची शक्यता
पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक रिंगणात यंदा अॅक्शन फाेर्स एम्पाॅईज असाेिसशनचे राज्य अध्यक्ष दीपकराज डाेंगरे उडी घेणार अाहेत. असाेिसएशनमध्ये विविध संवर्गातील कर्मचारी सक्रिय अाहेत. असाेसिएशनमध्ये पदवीधरांची संख्या साडे चार हजारांपेक्षा जास्त अाहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद शिक्षक समायाेजनप्रक्रियेिवराेधात असाेिसशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धावही घेतली हाेती. न्यायालयानेही याचिकेची दखल घेतली हाेती. एकूणच असाेिसएशन अापल्यासाठी न्यायालयीन लढाही लढते, असा विश्वास शिक्षकांमध्ये निमित्ताने पुन्हा निर्माण झाला हाेता. त्यामुळे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकासह विविध संवर्गातील पदवीधर असलेल्या कर्मचाऱ्यांची माेठी संख्याही निर्णायक ठरण्याची शक्यता अाहे. मतांची विभागणी काेणच्या पथ्यावर तर काेणाच्या मुळावर पडणारी ठरणार, हे स्पष्ट हाेणार अाहे.

काँग्रेसच्या खाेडकेंसाठी दुसरी फळी सक्रिय
राष्ट्रवादीतून काँग्रेसवासी झालेले अमरावतीचे संजय खाेडके यांनीही ‘पदवीधर’च्या निवडणुकीत कंबर कसली. गत लाेकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने अामदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत काैर यांना उमेदवारी दिली हाेती. याला खाेडके यांनी विराेध करत पक्ष त्याग केला. अाता पदवीधरसाठी फिल्डिंग लावली अहे. बुधवारी खाेडके यांनी अकाेल्यात काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांशी चर्चा केली. मात्र, काही दिवसांपूर्वी काँग्रेसमध्ये महानराध्यक्षनिवडीवरून दाेन गट पडले हाेते. दुसऱ्या फळीतील नेत्यांनी निवडीिवराेधात थेट प्रदेशाध्यक्षांकडे धाव घेतली हाेती. प्रदेशाध्यक्षांना ४० प्रमुख पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले हाेते. दुसऱ्या फळीतील नेत्यांनी निवडीिवराेधात अात्मक्लेष अांदाेलनाचा इशाराही दिला हाेता. मात्र, नंतर प्रदेशाध्यक्षांनी निवड रद्द हाेणार नसल्याचे स्पष्ट केल्याने बंड फसले हाेते.

राष्ट्रवादीला साेडचिठ्ठी दिल्यानंतर संजय खाेडके यांचे अकाेल्यातील समर्थक नगरसेवक माजी पदाधिकारी त्यांच्या पाठिशी उभे राहिले हाेते. अाता पदवीधरच्या निवडणुकीत खाेडके यांचे निवडक समर्थकच सक्रिय झाले अाहेत. खाेडके काँग्रेसवासी झाल्याने त्यांच्या सर्वच समर्थकांना काँग्रेसमध्ये अापले भविष्य उज्ज्वल दिसत नसल्याने त्यांनी सध्या तरी त्यांनी ‘वेट अॅड वाॅच’चे धाेरण अवलंबवले अाहे.
बातम्या आणखी आहेत...