Home | Maharashtra | Vidarva | Akola | post mar tom of that woman

कारवाईच्या आश्वासनानंतरच झाले ‘त्या’ महिलेचे शव विच्छेदन; पोलिसांचा चोख बंदोबस्त

प्रतिनिधी | Update - Oct 09, 2017, 10:00 AM IST

उपचारासाठी भरती असलेल्या महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येत नाही, तोपर्यंत मृतद

  • post mar tom of that woman
    बुलडाणा- उपचारासाठी भरती असलेल्या महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येत नाही, तोपर्यंत मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नाही, अशी भूमिका महिलेच्या नातेवाईकांनी घेतली होती. दरम्यान आज ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सरिता पाटील यांनी चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन नातेवाईकांना दिले. या आश्वासनानंतर मृत महिलेचे विच्छेदन करण्यात आले. त्यानंतर महिलेचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला.

    देऊळघाट येथील रहिवाशी कांताबाई गणेश हिवाळकर वय ५२ यांना ऑक्टोबर रोजी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक तीन मध्ये उपचारार्थ भरती केले होते. परंतु बराच वेळ होवूनही त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याने त्यांचा संध्याकाळी मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी संबधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नसल्याची भुमिका घेतली. त्यामुळे रुग्णालयात परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

    दरम्यान आज सकाळी शिवसेनेचे संजय गायकवाड यांच्यासह मृतकाचे नातेवाईक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी सुध्दा शव विच्छेदन करण्यापुर्वी संबंधित डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी रेटून धरली. त्यावर जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सरिता पाटील यांनी सदर प्रकरणी समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल. चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या आश्वासनानंतर नातेवाईकांनी महिलेच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यास मान्यता दिली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी महामुनी ठाणेदार सुनिल जाधव यांनी बंदोबस्त ठेवला होता.

Trending