आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्टरचे पाणी दाखवा १० हजार मिळवा’; अकाेल्यात ‘पाेस्टर वाॅर’, माेदींबाबत अाक्षेपार्ह मजकूर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - फिल्टर पाण्यावरून पाेस्टरवाॅर रंगल्याचा प्रकार मंगळवारी उमरी परिसरात उजेडात अाला. भाजप अामदाराच्या प्रयत्नांमुळे फिल्टरचे गाेड पाणी मिळल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी अाभाराचे पाेस्टर लावले. याला उत्तर म्हणून ‘फिल्टरचे पाणी दाखवा १० हजार मिळवा’, असे अावाहन करणारे दुसरे पाेस्टर विराेधकांकडून लावण्यात अाले. याप्रकरणी भाजप कार्यकर्त्याने सिव्हिल लाईन्स पाेलिस ठाण्यात तक्रार दिली अाहे .

सध्या जिल्ह्यात रस्त्यांसह इतरही विकास कामे सुरु अाहेत. अागामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन भाजपकडून भूमिपूजन अणि लोकार्पण साेहळे घेण्याचे सत्रच सुरु अाहे. नगराध्यक्ष, नगर पालिका प्रभाग निवडणुकीत भाजपला यश मिळाल्यानंतर अाता महापालिका निवडणुकीत जिंकण्यासाठी पक्षाने कंबर कसली अाहे. हद्दवाढ झाल्यानंतर शहरांनजीकच्या गावामध्येही भाजपाचा झेंडा फडकण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न सुरु केले अाहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी उमरीवासीयांना फिल्टरचे पाणी मिळल्याबद्दल अामदार रणधीर सावरकरांच्या अाभाराचा फ्लेक्स लावला. भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उमरी ग्रामस्थांतर्फे अाभार मानल्याचे फ्लेक्सवर नमूद केले. यावर विराेधकांकडून दुसरे फ्लेक्स लावले. फ्लेक्सवर अाक्षेपार्ह मजकूर असल्याने कार्यकर्ते संतप्त झाले.

यांनी केली तक्रार : पंतप्रधाननरेंद्र माेदींबाबत अाक्षेपार्ह फ्लेक्स लावण्यात अाल्याची वार्ता शहरात वाऱ्यासारखी परसली. याबाबत भाजप नेते जयंत मसने, संदीप गावंडे, प्रा. अमाेल नावकार यांनी सिव्हिल लाईन्स पाेिलस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पाेेलीसांनी चाैकशीला प्रारंभ केला अाहे.

देशद्राेहाचा गुन्हा दाखल करावा : माेदीहे देशाचे पंतप्रधान अाहे. त्यामुळे अाक्षेपार्य पाेस्टर लावल्याप्रकरणी पाेिलसांनी तातडीने संबंधितांविरुद्ध देशद्राेहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. याप्रकरणी कठाेर कारवाई हाेण्यासाठी अाम्ही पाठपुरावा करु, असे भाजपचे महानगराध्यक्ष किशाेर मांगटे पाटील यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...