आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी देतांना शेतकऱ्यांवर काेणत्याही अटी लादू नका : आंबेडकर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शेतकऱ्यांना कर्जमाफी भाजपच्या तत्वात बसत नाही. त्यामुळे ते शेतकऱ्यांवर अटी लादत आहेत. शेतकऱ्यांना सध्या मदतीची गरज असताना त्यांच्यावर अटी लादणे योग्य नाही, असे भारिप-बमसंचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर बुधवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. 

शासनाने शेतकरी आंदोलनानंतर घेतलेल्या भूमिकेचे वर्णन आंबेडकरांनी ‘फोकनाड’ शब्दात केले. अल्पभूधारक शेतकऱ्यांना १० हजार रुपये देण्याचे शासनाने जाहीर केले, परंतु प्रत्यक्षात सरकारच्या तिजोरित पैसाच नाही. तातडीची मदत देण्यासाठी हजार कोटी रुपये शासनाला द्यावे लागणार आहेत. एवढा पैसा शासनाजवळ नाही. एलआयसी, बँकांकडे शासनाची पत उरलेली नाही.त्या हमी घ्यायला तयार नाहीत, असेही आंबेडकर म्हणाले. जेमतेम वेतन आणि प्रशासकीय खर्च भागवण्याएवढा पैसा राज्य शासनाजवळ आहे. उत्तर प्रदेशात किसान बाँड बाजारात आणले परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. शासनाचे ३२ टक्के वेतन, पेंशन, १२ टक्के प्रशासकीय खर्च, ४२ टक्के भांडवली कर्जावरील व्याजापोटी द्यावे लागत आहेत. त्यामुळे शिल्लक आहे कुठे असा प्रश्न त्यांनी केला. 

राज्यात मध्यावधीची शक्यता नाही : महाराष्ट्रातमध्यावधी निवडणुकीची शक्यता दिसत नाही. शिवसेनेवर जरब बसवण्यासाठी भाजपकडून मध्यावधीचा बागुलबुवा उभा केला जात आहे. परंतु काही राज्यांच्या निवडणुकीसमवेत म्हणजे २०१९ पूर्वी निवडणूक होऊ शकते. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक सोबत घेण्याचे निश्चित झाल्यास राज्याची निवडणूक मुदतपूर्व होऊ शकते, असेही ते म्हणाले. अकोला महापालिकेने करामध्ये १० टक्के कपात केली हे आमच्या आंदोलनाचे यश असल्याचे सांगून मनपाने नवीन कर लादू नयेत त्याची काहीही गरज नाही. जे लोक कर भरत नाहीत त्यांच्याकडून सक्तीची वसुली करा. तसेच नागरिकांनी जुन्या कराचा भरणा करावा. 

नवीन कर भरु नये, असे आवाहनही त्यांनी केले.ईव्हीएम मध्ये घोटाळा असल्याचा पुनरुच्चार करुन जीएसटी लागू करण्याची घाई झालेल्या केंद्र शासनाचीअद्याप तयारीच नाही. त्यामुळे ही करप्रणाली अपयशी ठरणार, असे ते म्हणाले. 

भागवतांना आपला पाठिंबा : राष्ट्रपतीपदासाठीसरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव पुढे आल्यास पाठिंबा द्यायला आपण एका पायावर तयार आहोत, असे सांगून आंबेडकर म्हणाले, भाजपने राष्ट्रपतीपदासाठी सार्वमताची संधी गमावली आहे. 

माजी आमदार हरिदास भदे, माजी जि. प.अध्यक्ष शरद गवई, जि. प. सदस्य विजय लव्हाळे, प्रदीप वानखडे, काशीराम साबळे, गोपाल कोल्हे, अशोक शिरसाट, प्रसन्नजित गवई, विश्वजीत शिरसाट, पराग गवई, जीवन डिगे या वेळी उपस्थित होते. 

राष्ट्रपती पदासाठी आदिवासी उमेदवार द्या 
राष्ट्रपती पदासाठी विरोधी पक्षांची बुधवारी महत्वाची बैठक होत आहे. त्यास अनुसरुन आपण राष्ट्रपती पदासाठी आदिवासी व्यक्तीचा विचार व्हावा असे सुचवले आहे. त्यामुळे पूर्वोत्तर राज्ये तसेच देशातील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणे सोपे जाईल, हा दृष्टिकोन असल्याचे आंबेडकर म्हणाले. यावेळी प्रकाश अांबेडकरांनी राज्य शासन अाणि कर्जमाफीबद्दल अापले विचार स्पष्टपणे मांडले. विविध राजकीय विषयांवर त्यांनी अापली मते मांडली. यावेळी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती हाेती. 

 
बातम्या आणखी आहेत...