आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिसेस इंडिया स्पर्धेमध्ये अकोल्याच्या प्रणाली द्वितीय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गृहिणी म्हणून घर सांभाळताना, नोकरी करताना येणारे अनुभव आणि विविध राऊंड मधून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्याचा अनुभव अनोखा होता. डिसेंबर महिन्यात चार दिवस रंगलेल्या मिसेस इंडिया स्पर्धेत विविध राऊंड पार करत द्वितीय स्थान पटकावले. तर आता पुढे ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या ‘मिसेस वर्ल्ड’ स्पर्धेचे लक्ष्य असून, तेथे देखील शहराचे नाव उंचवायचे आहे, असा मानस मिसेस इंडिया स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाच्या मानकरी अकोल्याच्या प्रणाली सातारकर यांनी व्यक्त केला. सोमवार, जानेवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी स्पर्धेबाबत, खिताबाबाबत माहिती दिली. 

सौंदर्य प्रसाधने, आधुनिक फॅशन मॅगेझीन व्यवस्थेतील आंतरराष्ट्रीय व्यासपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘फेम’ या संस्थेच्या वतीने मुंबई येथे २७ डिसेंबर पासून फेड इंडियाची मिसेस इंडिया ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत दिल्ली, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र यासह अनेक राज्यातील गृहिणी सहभागी झाल्या. १५ महिलांपैकी विविध टप्पे पार करत अंतिम टप्प्यात महिला पोहोचल्या. यात स्पर्धेत फोटो शूट, टॅलेंट, नववधू, साडी, वेस्टर्न गाऊन अशा विविध फेऱ्या आणि एक प्रश्नोत्तराची फेरी झाली. या सर्व फेऱ्या पार करत द्वितीय स्थान प्राप्त केले. प्रथम स्थान मुंबईच्या गृहिणीने मिळवला. राज्याचे मंत्री गिरीश महाजन, बॉलीवूड कॉर्पोरेट जगतातील हिरा तिवारी, योगेश लाखाणी, अमित मेहता, अॅड. आनंद पुरोहित, इवेंट संचालिका फेमची ब्रँड अॅम्बेसेडर नेहा परोहा, निरस परोहा यांच्या उपस्थितीत मिसेस इंडियाचा द्वितीय क्रमांकाचा मुकूट घालण्यात आला. फेमचे संचालक अमोल मेटकर असून, निवेदक आसिफ खान यांनी स्पर्धेचे निवेदन केले. बालपणापासून मिस वर्ल्ड होण्याचे स्वप्न होते. पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये इव्हेंट समन्वयक म्हणून काम करत असताना सोशल मिडीयाच्या माध्यमातून विविध स्पर्धांची माहिती घेणे सुरू असते. त्या माध्यमातूनच या स्पर्धेची माहिती मिळाली अर्ज केला. वयाच्या चौथ्या वर्षांपासून नृत्य अन्य शालेय स्पर्धेत घेत असलेल्या सहभागामुळे कलागुणांना वाव मिळत होता. त्यामुळे आत्मविश्वास देखील वाढला. या सर्व बाबींचा या स्पर्धेत बराच फायदा झाला. शिवाय गिटार वादनाची आवड अाहे. 

गावाचे नाव उंचवणार 
या स्पर्धेतील विजयामुळे कुटूंबाचेच नाही तर शहराचे नाव देश पातळीवर उंचावले गेले आहे. तसेच आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील विजय मिळवून नवी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे प्रणाली सातारकर यांनी सांगितले. यावेळी त्यांचा मुलगा तनिष्य, मुलगी तोष्वी, वडील वामनराव म्हैसने, आई अरुणा म्हैसने, मामा राजेश तऱ्हाळे उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...