आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विकारांचे रुपांतर विचारांत करणारी राष्ट्रसंतांची प्रार्थना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- ‘राष्ट्रसंतानी सुंदर विचार मांडले आहेत. राष्ट्रभक्तीची प्रेरणा त्यांच्या विचारांतून, प्रार्थनेतून मिळते. राष्ट्र संतांच्या प्रार्थनेतून अंत: निरीक्षण म्हणजेच स्वत:चे आत्मपरीक्षण होते. ही अंतःकरण शुद्ध करणारी प्रार्थना संयम, सदाचार शिकवते. त्यामुळे विकारांचे रुपांतर विचारात होते,अशी ही प्रार्थना आहे,’ असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. अरविंद देशमुख यांनी केले. 


येळगावातील स्व.पंकज लद्धड इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज, बुलडाणा भारतीय विचार मंचतर्फे पंकज लद्धड इंजिनिअरींग कॉलेजमध्ये पाचवे विदर्भस्तरीय वं.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाचे उद््घाटन रविवारी, २६ नोव्हेंबरला करण्यात आले. या संमेलनाचा समारोप सायंकाळी वाजता करण्यात आला. या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना देशमुख बोलत होते. संमेलनाचे प्रास्ताविक रवींद्र लध्दड यांनी केले. मंचावर सुभाष लोहे, प्राचार्य प्रदीप जावंधिया, प्रदीप चिंचोळकर, रमेश सावजी, आदींची उपस्थिती होती. या वेळी व्यंकटगिरी बालाजी मंदिराचे संचालक अरुण दिवटे यांचा सत्कार केला.संमेलनाचे संचालन रघुनंदन देशपांडे यांनी,आभार बाळ अयाचित यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रवंदनेने केली. राष्ट्रवंदना सुशीलकुमार वनवे यांनी सादर केली. 


साहित्यातूनजगण्याची प्रेरणा मिळते :माणसाचे मुलभुत प्रश्न संपले की त्यांनी साहित्य वाचले पाहिजे. साहित्य हे प्रत्येक काळात मानवी जीवनाला जगण्याची प्रेरणा दिली आहे. साहित्यातून विजिगिषु प्रवृत्ती निर्माण होते. म्हणजे माणसाची प्रवृत्ती राष्ट्राभोवती असली पाहिजे. साहित्यावर कोणी टीका करते, कोणी समीक्षण करते परंतु, साहित्य हे कुपोषित जीवनाला विकसित करते, असेही मार्गदर्शन देशमुख यांनी केले. तर ग्रामगिता ही राष्ट्रसंतांनी शेतकऱ्यांना समर्पित केली आहे. त्यामुळे जेवणाचा घास घेतांना ज्या शेतकऱ्याने धान्य उत्पादित केले त्याचे स्मरण निश्चित केले पाहिजे, अशी भावनाही शेतकऱ्यांप्रति देशमुख यांनी व्यक्त केली. 

बातम्या आणखी आहेत...