अकाेला - महानगरात स्वच्छता हवी की, घाणीत रहायचे, हे अकाेलेकरांनी ठरवावे, असे मत भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश अांबेडकर यांनी शनिवारी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने अायाेजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. त्यांनी सत्ताधारी भाजप-शिवसेनेवरही टिका करत भारिप-बमसं सत्तेत अाल्यास विकास कसा करण्यात येईल, हेही सांगितले.
महापालिका निवडणुकीत डावे सामाजिक संघटनांना साेबत घेण्यात येणार असले तरी नेतृत्व मात्र भारिप-बमसंकडेच राहिल. सर्वच ८० जागांवर उमेदवार उभे करण्यात येणार असून, अर्जाची विक्री, स्वीकृती असे प्रकार करण्यात येणार नसल्याचे अॅड. अांबेडकर यांनी स्पष्ट केले. उमेदवार निवडीसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली असून, यामधून अामदारांना दूर ठेवल्याचेही ते म्हणाले. निवडणूक साेबत लढण्यासाठी संभाजी ब्रिगेडचा प्रस्ताव अाल्यास स्वागतच करू, असेही ते म्हणाले.
महापालिकेत पहिल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात भारिप-बमसंची सत्ता हाेती. अाम्ही नागरिकांना दाेन दिवसांअाड पिण्याचे पाणी दिले हाेते. मात्र, नंतरच्या सत्ताधाऱ्यांना हे शक्य झाले नाही. त्यांचे कामकाज बेभरवशाचे अाहे. त्यामुळे या निवडणुकीत भारिप-बमसंला काेणाचा पाठिंबा घेण्याची वेळ येणार नाही, असे निर्विवाद बहुमत मिळाल्यास जनहिताच्या याेजना राबवणे शक्य हाेईल, असेही अॅड. अांबेडकर म्हणाले. पत्रकार परिषदेला बालमुकुंद भिरड, माजी अामदार हरिदास भदे, जिल्हाध्यक्ष अामदार बळीराम सिरस्कार, कार्याध्यक्ष काशिराम साबळे, बुद्धभूषण इंगाेले, प्रसन्नजित गवई, धैर्यवर्धन पुंडकर, अासिफ खान, नगरसेवक गजानन गवई, बबलू जगताप, वंदना वासनिक, अरुंधती शिरसाट, अासिफ खान, डाॅ. प्रसन्नजित गवई, प्रदीप वानखडे उपस्थित हाेते.
भाजपमुळे याेजना रखडली
भारिपच्या पहिल्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात भुयारी गटार याेजना मार्गी लागण्यसाठी प्रयत्न केले. यासाठी राज्य केंद्र सरकारकडून निधीही खेचून अाणला. मात्र, नंतरच्या काळात सत्तांतरानंतर विद्यमान खासदारांनी ही याेजना नकाे असल्याचे राज्य केंद्र सरकारला कळवल्याचा अाराेप अॅड. अांबेडकर यांनी केला. त्यानंतर हा पैसा एका मंत्र्यांने स्वत:च्या मतदारसंघात वापरला. फाेरजीसाठीही भारिप-बमसंच्या सत्तेत रिलायंसशी जुने शहरात डायलीसीस सेंटर टिळक राेडवरील भरतिया रुग्णालय महिलांसाठी विकसित करण्याचा करार झाला हाेता. मात्र, नंतरच्या काळातील भाजप-शिवसेनेच्या सत्ताधाऱ्यांनी त्यानुसार नियाेजन केले नाही. भाजप-शिवसेनेच्या धाेरणाचा फायदा संबंधित कंपनीला झाला, असेही ते म्हणाले.
प्रभागपद्धतीचा फटका बसला : नगराध्यक्ष,नगरपालिका निवडणुकीत प्रभाग पद्धतीचा फटका बसल्याचे अॅड. अांबेडकर म्हणाले. बाळापूर विधानसभा मतदारसंघ भारिप-बमसंच्या ताब्यात अाहे. सलग दाेन वेळा भारिप-बमसंचा अामदार निवडून येत अाहे. नगराध्यक्ष नगर पालिका प्रभाग निवडणुकीत भारिप-बमसंचे बाळापूरमध्ये एमअायएमशी घराेबा केला हाेता. मात्र, बाळापूर विधानसभा मतदार संघात येत असलेल्या बाळापूर पातूर येथे भारिप-बमसंचा धुव्वा उडाला हाेता. अकाेट येथे तीन उमेदवार तेल्हारा येथे केवळ एकच उमेदवार निवडून अाला नाही.
अकाेट तेल्हारा पंचायत समिती भारिप-बमसंच्या ताब्यात अाहे. जि. प. अध्यक्ष, उपाध्यक्षही या दाेन्ही तालुक्यातीलच अाहेत. कार्याध्यक्षपदही तेल्हारा तालुक्यात अाहे, असे असतानाही भारिप-बमसंची या निवडणुकीत प्रचंड पिछेहाट झाली हाेती.
पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढणे विचाराधीन : अमरावतीिवभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारिप-बमसंचा उमेदवार उतरवण्याची बाब विचाराधीन असल्याचे अॅड. अांबेडकर म्हणाले. मात्र, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा येथील जिल्हाध्यक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्याने पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढणे शक्य हाेणार नसल्याचे कळवले अाहे. मात्र, तरीही त्यांच्याशी चर्चा सुरू असून, लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही अॅड. अांबेडकर यांनी स्पष्ट केले.
आमदार कडूंशी झाली चर्चा : प्रहारसंघटनेचे प्रमुख अामदार बच्चू कडू यांच्याशी अमरावती जिल्ह परिषद निवडणुकीबाबत चर्चा झाल्याचे अॅड. आंबेडकर यांनी सांगितले. या दाेघांमध्ये शुक्रवारी दुपारी भेट झाली हाेती. अॅड. आंबेडकर यांच्याशी चर्चा झाल्याचे कडू यांनी सांगितले हाेते. दुसऱ्या भेटीमध्ये निवडणुकीचे धोरण निश्चित होईल, असेही त्यांनी सांगितले हाेते. मनपा निवडणुकीच्या निमित्ताने काही दिवसांपूर्वीच अामदार कडू यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली हाेती, हे येथे उल्लेखनीय.
...तरच हाेईल शक्य
महापालिकेतस्पष्ट बहुमत दिल्यास पुढील याेजना, कामांच्या माध्यमातून विकास करण्यात येईल, असे अॅड. अांबेडकर यांनी सांगितले.
१.माेठे इनअाेर स्टेडियम उभारण्यात येईल.
२. महानगरातील खुल्या जागांवर संध्याकाळी भाजी इतर साहित्य विक्रीचे दुकाने उभारण्यात येतील.
३. शहर बस वाहतूक सेवेत भ्रष्टाचार झाला असून, चाैकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल प्रवासी बस सेवा सुरळीत करण्यात येईल.
४. माेर्णा नदीचे खाेलीकरण करुन बंधारा बांधण्यात येईल. त्यामुळे शहरात स्वच्छ पाणी वाहणार असून, याठिकाणी संध्याकाळी नागरिकांना फिरताही येईल.
५. झाेपडपट्टी निर्मूलन याेजना राबवण्यात येणार अाहे.
६. राज्य केंद्राकडून मिळणाऱ्या निधीतून गृहनिर्माण याेजना राबवताना ५५० स्क्वेअर फूट घर मिळेल, याची काळजी घेण्यात येईल.
७. मनपा शाळांच्या इमारतीमध्ये स्पर्धात्मक परिक्षांचे वर्ग घेण्यात येतील.
पत्रकार परिषदेत बाेलताना भारिप-बमसंचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश अांबेडकर इतर.