आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहिणींचे बजेट कोलमडले, भाजीपाला शंभरीकडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या भाज्यांचे भाव कडाडल्याने गृहिणींचे बजेट पार कोलमडले आहे. एरवी रोज कोणती भाजी करायचा हा गहन प्रश्न गृहिणींसमोर असला तरी काही भाज्यांनी शंभरी गाठल्याने हा प्रश्न यक्ष प्रश्न झाला आहे.
 
पावसाळा सुरू झाला की भाज्यांचे भाव पार आकाशाला भिडतात. यावर्षी पावसाने दडी मारली असली तरी अावक घटल्याने भाज्यांचे भाव प्रचंड वाढले आहे.
रोजच्या भाजीत वापरले जाणारे टमाटे, हिरवी मिरची आणि कोथिंबीरने तर शंभरी पार केली आहे. इतर फळभाज्या देखील ६० ते ८० रुपये किलो झाले आहेत. आठवडा भराची भाजी घेणे तर दूर रोजची भाजी घेताना देखील गृहिणींचे बजेट चुकत आहे. रोज काय खावे, कोणती भाजी करावी हा प्रश्न महिलांसमोर असतोच त्यात आता बजेट बसवता बसवता गृहिणींच्या नाकी नऊ येत आहे. त्यामुळे महिलांचे बजेट कोलमडले.
 
आवक घटली
शहरात भाज्यांची अावक घटल्याने सर्वच भाज्यांचे भाव वाढले आहे. होलसेल मार्केट मध्येच भाज्यांचे भाव जास्त असल्याने चिल्लर विक्रेत्यांकडे देखील भाव अधिक आहे.’’
- अमोल भाकरे पाटील, भाजी विक्रेता
 
मुलांचे डबे अवघड
मुलांनाटिफीनमध्येकोणती भाजी द्यायची याचा मेनू शाळेतून येतो. त्यामुळे तीच भाजी मुलांना द्यावी लागते. भाज्यांचे भाव एवढे वाढले की रोज काय करावे, हा प्रश्नच आहे.’’
- रुपाली फुरसुले, गृहिणी
बातम्या आणखी आहेत...