आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्व आहे मुलगा शहीद झाल्याचा; सुरेश खंडारे, शहिदांना सामूहिक श्रद्धांजलीने गहीवरले पिंजरवासी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिंजर- मला गर्व आहे मुलगा शहिद झाल्याचा, असे भावोद््गार शहीद संजय यांचे वडील सुरेश खंडारे यांनी काढले. हिमस्खलनातील शहिदांना सामूहिक श्रद्धांजलीने पिंजरवासी गहीवरले. या वेळी सुरेश खंडारे बोलत होते. 

पिंजर येथील गजानन महाराज संस्थानच्या वतीने दरवर्षी भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यादरम्यान धार्मिक तथा सामाजिक उपक्रम राबवल्या जातात. या अंतर्गत समाजातील कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात. यावर्षी मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा करून ही परंपरा कायम ठेवली आहे. विशेष म्हणजे यावर्षी मागील महिन्यात जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या हिमस्खलनामध्ये शहीद झालेल्या शुरविरांना सामूहिक श्रद्धांजली त्यांच्या माता पित्यांचे सांत्वन अशा भावनिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

हिमस्खलनामध्ये शहीद झालेले अकोला जिल्ह्यातील अमोल गवई संजय खंडारे या जवानाच्या माता, पिता नातेवाइकांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. माना येथील सुरेश खंडारे, सुलोचना खंडारे, शत्रुघ्न गवई, गोकर्णा गवई, बहीण संगीता इंगळे यांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. सामूहिक श्रद्धांजली अर्पण करून आयोजकांनी शहिदांचे पिता शत्रुघ्न गवई सुरेश खंडारे यांना बोलते करून शहिदांचे जीवन चरित्र जाणून घेतले. तेव्हा त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून उपस्थित मंचावरील पाहुणे मंडळी, तथा मंडपातील शेकडो नागरिक महिलांच्या डोळ्यातून अश्रु अनावर झाले. 

मुलगा शहिद झाल्यावरही या माता पित्यांची देशाविषयी आत्मियता पाहून सर्व मंडप भाऊक झाला होता. संस्थानचे अध्यक्ष अनिल वडुरकर, प्रीती वडुरकर, स्वाती वडुरकर, सुनील वडुरकर यांच्याकडून शहिदांच्या मातापित्यांचा सन्मान करण्यात आला.
 
कार्यक्रमासाठी उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे, प्रकल्प अधिकारी ए. लव्हाळे, मनपाचे प्रशासन अधिकारी प्रदीप चोरे, शिक्षण विभागाचे संतोष दहापुते, इतर अधिकारी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी सरपंच अंजली अशोकराव इंगळे होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रमेशआप्पा खोबरे, मा. सरपंच प्रदीपराव लहाने, विठ्ठल महाराज इंगळे, जवंजाळ गुरुजी, बंडु राऊत, पत्रकार प्रदीप गावंडे, विठ्ठलराव देशमुख उपस्थित होते. प्रास्ताविक अध्यक्ष अनिल वडुरकर, संचालन दीपक सदाफळे यांनी केले. 
बातम्या आणखी आहेत...