आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचार्यांना कटिंग पडली एक लाख रुपयात; मोबाइलसह साहित्य केले लंपास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मूर्तिजापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र मनोहर लाडखेडकर हे सलूनमध्ये कटिंग करण्यासाठी गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरातील मोबाइलसह साहित्य लंपास केले. घरी आल्यानंतर त्यांना जेव्हा प्रकार लक्षात आला. त्यांना कटिंग करायला जाणे लाख रुपयांनी महागात पडले.

प्राचार्य राजेंद्र लाडखेडकर हे तोष्णीवाल ले-आउटमध्ये ताथोड मंगल कार्यालयाच्या मागे राहतात. बुधवार, नोव्हेंबर रोजी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास ते कटिंग करण्यासाठी घराबाहेर पडले. अर्ध्या तासानंतर घरी आले तेव्हा त्यांना घराचे कुलूप तोडलेले दिसले. आतमधील मोटोरोला कंपनीचा मोबाइल किंमत ११ हजार रुपये, लॅपटॉप किंमत ४० हजार रुपये, पत्नीच्या पर्समध्ये ठेवलेले १० हजार रुपये, सोन्याची साखळी २० हजार रुपये, सोन्याची अंगठी हजार रुपये, असा ६१ हजारांच्या ऐवजासह आणखी काही साहित्य लंपास केल्याचे दिसून आले. याप्रकरणी त्यांनी सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. घरातून अशाप्रकारे साहित्याची चोरी होण्याच्या घटनेत सिव्हिल लाइन पोलिस ठाण्यांतर्गत वाढ झाली आहे. पोलिसांना चोरांना पकडण्यात अपयश आले आहे.

दिवसा चोरी, पोलिस करतात तरी काय?
शहरातीलमोक्याच्या ठिकाणी असलेल्या घरातून जर अशाप्रकारे साहित्याची चोरी होत असेल, तर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येते. त्यामुळे पोलिस अधीक्षक चंद्र किशोर मीणा यांनी आता दिवसासुद्धा पेट्रोलिंगवर भर द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.