आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासगी शाळांमधील शिक्षक करणार अांदाेलन, न्यायालयीन लढ्याचीही तयारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - खासगी अनुदानित शाळांमधील नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेले प्राथिमक शिक्षक अांदाेलन करण्याच्या तयारीत अाहेत. काही शिक्षकांनी न्यायालयीन लढ्याचीही तयारी केली असून, त्यांनी बुधवारी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन पत्रही दिले.
खासगी अनुदानित शाळांमधील प्राथमिक शिक्षकांच्या अाॅनलाईन समयाेजनाची प्रक्रिया शिक्षण विभागाने राबवली हाेती. यासाठी १२ सप्टेंबर राेजी संध्याकाळी रिक्त अतिरिक्त शिक्षकांची यादीही जाहीर करण्यात अाली. १३ सप्टेंबर राेजी शासकीय सुटी असल्याने अनेक शिक्षकांना समायाेजन यादी प्रकाशित झाली, ही माहितीच मिळाली नाही.

अनेकांना १४ सप्टेंबर राेजी ही माहिती मिळाली. सकाळी १० वाजतापासून तीन राऊंडमध्ये समायाेजनाची प्रक्रिया पार पडली. याबाबतचे पत्र शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण संचालकांना पाठविले हाेते. पत्राची प्रत मुख्याध्यापक शिक्षकांनाही पाठवण्यात अाली हाेती.

संस्थांनापत्र देऊ : खासगीप्राथमिक शिक्षकांना रूजू करुन घेण्याबाबत संबंधित संस्थांना यापूर्वीच पत्र दिले हाेते. रूजू करुन घेणाऱ्या संस्थांना पुन्हा पत्र देण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाहीची प्रक्रिया पार पाडण्यात येईल. - प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, प्राथिमक.

शिक्षणसंस्थां बाबत लवचिक धाेरण का? : खासगीप्राथिमक शिक्षकांच्या समायाेजनाबाबत शिक्षण विभागाने संचालकांना पत्राद्वारे कळविले हाेते. या पत्राची प्रत संबंधित शाळांचे मुख्याध्यापक शिक्षकांनाही पाठवण्यात अाली हाेती. जेणेकरुन समायाेजनाच्या स्थळीच शिक्षकांचा कार्यमुक्त रूजू करुन घेण्याची प्रक्रिया पार पडेल. मात्र अाता या शिक्षकांना रूजू करुन घेण्यात अाले नाही. वास्तविक जिल्हा परिषद शिक्षकांच्या समायाेजनाच्या वेळी संबंधित शाळांचे मुख्याध्यापकांना हजर राहण्यास सांगितले हाेते. त्यानुसार हे मुख्याध्यापक हजर हाेते. परिणामी शिक्षकांना कार्यमुक्त रूजू करुन घेण्याची प्रक्रिया तेथेच पार पडली. हीच पद्धत खासगी शिक्षक समायाेजनाच्या वेळी का राबवण्यात अाली नाही, असा सवाल अाता शिक्षकांमधून उपस्थित करण्यात येत अाहे.

संस्थाकरणार शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा : रूजूकरुन घेणाऱ्या शिक्षकांनी बुधवारी शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र दिले. ‘शिक्षणाधकाऱ्यांशी रूजू करुन घेण्याबाबत चर्चा करु’ असे शिक्षकांना संस्थांनी सांगितल्याचे शिक्षकांनी पत्रात नमूद केले अाहे. वास्तविक रूजू घेण्याचे अादेश यापूर्वीच शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थांना दिले अाहेत.

शिक्षकांना रजू करुन घेणाऱ्या अाणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या अादेशाचे पालन करणाऱ्या संस्थांवर काेणती कार्यवाही हाेऊ शकते, याबाबत शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची चर्चा करण्यात अाली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या मािहतीनुसार शिक्षकांना रूजू करुन घेतल्यास संस्थांचे अनुदान बंद हाेऊ शकते. संस्थेची मान्यता रद्द करण्याची शिफारस शासनाकडे पाठता येते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले हाेते. अादेश दिल्यानंतरही शिक्षकांना रूजू करुन घेणाऱ्या संस्थांवर शिक्षण विभाग काेणती कार्यवाही करेल, याकडे शिक्षकांचे लक्ष लागले अाहे. खासगी शिक्षक समायाेजनाच्या वेळी का राबवण्यात अाली नाही, असा सवाल अाता शिक्षकांमधून उपस्थित करण्यात येत अाहे. तसेच काही शिक्षक अाता न्यायालयीन लढ्याचीही तयारी करत अाहे.
खासगीसंस्थांमधील अनुदानित पदावरील अतिरिक्त शिक्षकांच्या (माध्यमिक) समायाेजनासाठीची प्रक्रिया पार पडल्यानंतरही नियुक्तीचे अादेश शिक्षण विभागाकडून जारी करण्यात अालेले नाहीत. समायाेजनाबाबत न्यायालयात एक-दाेन दिवसात सुनावणी हाेणार असून, शुक्रवार किंवा त्यानंतरच अादेश जारी करण्याबाबत निर्णय हाेणार अाहे.

जिल्हा परिषद शिक्षकांच्या समायाेजनानंतर खासगी संस्थांमधील अनुदानित पदावरील शिक्षकांच्या समायाेजनाची प्रक्रिया राबवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. समायाेजनासाठी १० जून २०१६ राेजी शिक्षण अायुक्तांनी मार्गदर्शक तत्वे जारी केली हाेती.
अायुक्तांनी २२ अाॅगस्ट ते २५ अाॅगस्टपर्यंत या दरम्यान, ही प्रक्रिया राबवण्याची सूचना अायुक्तांनी दिल्या हाेत्या. मात्र काही शिक्षण संस्थांनी अावश्यक माहितीच सादर केल्याने वेळापत्रक पुरते काेलमडले हाेते. या शिक्षण संस्थांना शरण जात शिक्षण विभागाने स्वत:च नवीन वेळापत्रक तयार केले. मात्र या वेळापत्रकानुसारही समायाेजनाची प्रक्रिया राबवण्यात अाली नाही. अखेर समायाेजनाचा मुहुर्त सापडल्याने मंगळवारी दिवसभर समायाेजनाची प्रक्रिया राबवण्यात अाली.

अतिरिक्त शिक्षकांनी करायचे काय? : मराठीमाध्यमाच्या एकूण १०८ अतिरिक्त शिक्षकांपैकी ५८ शिक्षकांचे समायाेजन झाले झाले. मात्र या शिक्षकांना नियुक्तीचे अादेशच देण्यात अाले नाहीत. तसेच ५० शिक्षकांचे समायाेजन चवथ्या राऊंडमध्ये हाेणार अाहे. हिंदी माध्यमाच्या अतिरिक्त असलेल्या सातही शिक्षकांचे समायाेजन चवथ्या राऊंडमध्ये हाेणार अाहे.
उर्दू माध्यमाच्या अतिरिक्त पाच शिक्षकांपैकी शिक्षकांचे समायायाेजन झाले असून, शिक्षकांचे समायाेजन चवथ्या राऊंडमध्ये हाेणार अाहे. चवथ्या राऊंडमध्ये समायाेजन हाेणाऱ्या शिक्षकही नेमके काय करतील, हेही अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे या सर्व शिक्षकांना काेणतेही काम करताच वेतन देण्यात येणार अाहे काय, कि त्यांना इतर शासकीय कामे देण्यात येतील, असेही अद्याप निश्चित नाही.

असा फरक का? : जिल्हापरिषद प्राथमिक शिक्षकांच्या समायाेजनाची प्रक्रियेच्या वेळी संबंधित शाळांच्या मुख्याध्यकांनाही बाेलावण्यात अाले हाेते. त्यामुळे समायाेजनानंतर मुख्याध्यकांंच्या उपस्थितीतच शिक्षकांना कार्यमुक्त रूजू करुन घेण्याची प्रक्रियादेखील राबवण्यात अाली. अशीच प्रक्रिया खासगी खासगी संस्थांमधील अनुदानित पदावरील शिक्षकांच्या समायाेजन प्रक्रियेत का राबवण्यात अाली नाही, न्यायालयीन खटला पुढे करीत संस्थांच्या साेयीची भूमिका घेण्यात येत अाहे काय, असे एक ना अनेक प्रश्न अाता पालक-शिक्षकांमधून उपस्थित करण्यात येत अाहेत.
याबाबत शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दाेन दिवसानंतर नियुक्ती अादेश जारी करण्याचा निर्णय घेऊ, असे सांगितले.

घाेळातघाेळ : समायाेजनप्रक्रियेत विषय बदलण्यात अाल्याचे प्रकार घडल्याचे शिक्षकांचे म्हणणे अाहे. अनेक शाळांमध्ये संबंधित विषयासाठी जागा रिक्त नसतानाही संबंधित शिक्षकाची नियुक्ती करण्यात अाल्याचे शिक्षकांचे म्हणणे अाहे. अाता शाळा या शिक्षकांना रूजू करुन घेणार कि नाही, हा प्रश्नच अाहे. तसेच समायाेजनाची माहिती पुणे येथील एनअायसीला अाॅनलाईन पाठवण्यात अाली हाेती.

माहिती पाठवण्यात अनेक अडचणी अाल्या हाेत्या. काहींची विषयाची माहितीही चुकाची हाेती. समायाेजनाची प्रक्रिया राबवण्यात अालेल्या सभागृहाबाहेर तर एका शाळेने तर ‘संगणकावर एक पद रिक्त दिसत असले तर प्रत्यक्षात पद रिक्त नसून, अतिरिक्त शिक्षकांनी या पदावर हक्क दाखवू नये,’, अशा सूचनेचा कागदच चिकटवला हाेता. दरम्यान, अनुदानित पदावरील अतिरिक्त शिक्षकांच्या (माध्यमिक) समायाेजनासाठीची प्रक्रिया पार पडल्यानंतरही नियुक्तीचे अादेश शिक्षण विभागाकडून जारी करण्यात अालेले नाहीत.

६१शिक्षकांचे चवथ्या राऊंडमध्ये समायाेजन हाेणार अाहे. शिक्षकांच्या तालुका, जिल्हा, विभाग, राज्य, अशा क्रमानुसार बदल्या हाेऊ शकतात. अाता ६१ शिक्षकांचे विभागस्तरावर अथवा राज्यस्तरावर समायेजन हाेते कि काेणता वेगळा मार्ग निघताे, हे येणाऱ्या काळात स्पष्ट हाेणार अाहे. त्यामुळे अनेक शिक्षकांनी साेयीच्या ठिकाणच्या शाळेवर नियुक्ती व्हावी, यासाठी ‘फिल्डींग’ लावल्याचे समजते.

केवळ पत्रावर पत्र : रूजूकरुन घेतलेल्या शिक्षकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना यापूर्वीही पत्रही दिले हाेते. काही शिक्षकांना संबंधित संस्थेने अाेबीसीचे जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सांगितले हाेते. मात्र या शिक्षकांची खुल्या प्रवर्गातून नियुक्ती झाली अाहे,हे येथे उल्लेखनीय.

केवळ दाेन शिक्षक झाले रुजू
१३ शिक्षकांच्या समायाेजनाची प्रक्रिया पार पाडण्यात अाली. त्यानंतर १५ जागाही रिक्त राहिल्या. समायाेजन झालेल्या शिक्षकांना शिक्षण विभागाने संबंधित शाळांवर रूजू हाेण्याचा अादेशही दिला. मात्र या १३ पैकी शिक्षकांना रूजू करुन घेण्यात अाले. इतर ११ शिक्षकांना रूजू करुन घेण्यात अाले नाही.

शिक्षक देणार न्यायालयीन लढा
अनेक शिक्षक वेतनापासून वंचित असल्याचा मुद्दा पुढे अाला हाेता. दाेन वर्षांपासून सात शिक्षक-शिक्षिका वेतनापासून वंचित अाहेत. या शिक्षकांना लवकरच तुमचा प्रश्न निकाली निघेल, अशी ग्वाही देण्यात अाली हाेती. मात्र हा प्रश्न निकाली निघाल्यास पुढील अाठवड्यात न्यायालयात धाव घेऊ, असा इशारा या शिक्षकांनी दिला अाहे.
बातम्या आणखी आहेत...