आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विकासाऐवजी भावनिक महत्त्व दिल्यानेच मुस्लिमांची दुरवस्था, प्रा. शम्सुद्दिन तांबोळी यांचे भाष्‍य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - इस्लाममध्ये ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, वास्तवात त्या मुस्लिम लोकांपर्यंत पोहोचतच नाहीत. महम्मद पैगंबरांनीदेखील प्रत्येक समस्येचे उत्तर कुराणात सापडेल असे नाही, तर आपल्या विवेक बुद्धीने विचार करून मार्ग शोधावे, असे सांगितले आहे.
 
पण, वास्तवात तसे घडत नाही आहे. विकासाला महत्त्व द्यावे की भावनिक महत्त्व द्यावे यापैकी विकासाऐवजी भावनिक महत्त्व दिल्याने मुस्लिम समाजाची दुरवस्था झाली आहे, असे प्रतिपादन पुणे येथील प्रा. शम्सुद्दिन तांबोळी यांनी केले. बाबूजी देशमुख वाचनालयातर्फे आयेाजित प्रमिलाताई ओक सभागृह येथे ऑक्टोबर रोजी नवरात्री व्याख्यानमालेत त्यांनी पहिले पुष्प गुंफले. 
 
प्रा. तांबोळी यांनी ‘मुस्लिम समाज- प्रतिमा, वास्तव, सुधारणा’ याविषयी विचार मांडले. इस्लामचा एक अर्थ शांतता तर दुसरा अर्थ ईश्वराच्या चरणी नतमस्तक होणे असे सांगितले आहे. कुराणमधील सर्वात पहिला शब्द म्हणजे इकरा आहे त्याचा अर्थ वाचन करणे असा होतो. यापासून इल्म म्हणजे शिक्षण, ज्ञान असा शब्द आला. ज्ञानाचे उपाययोजना करणे, त्याचा विस्तार करणे आणि संशोधन करणे अशी शिकवण महम्मद पैगंबरांनी दिली अाहे. इस्लाममध्ये पिलर्स सांगितली आहेत. त्याचे पालन केले तर चुकीच्या मार्गाने जाऊच शकत नाही. पण, तलाक पद्धत, जिहाद संकल्पना या इस्लामात फार वेगळ्या आहेत. आणि प्रत्यक्षात मात्र त्याची अंमलबजावणी विरुद्ध होत आहे. आज स्थिती सुधारायची असेल तर योग्य काय आणि अयोग्य काय याचा विवेकाने निर्णय घेण्याची गरज आहे. मुस्लिम समाजात सुधारणा होण्यासाठी समाजाने आत्मपरीक्षण करण्याची सर्वाधिक गरज आहे. 

हिंदूत्ववादी संघटना आणि सत्ताधारी पक्ष हे देखील कारणीभूत असून त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. भावनिक प्रश्नांना अधिक महत्त्व देण्यात आले. विकासासाठी जे महत्त्वाचे होते त्याकडे मात्र दुर्लक्ष झाले. नेतृत्वाचा अभाव हे सुद्धा एक कारण आहे. त्यामुळे या सर्व बाजूंनी सुधारणा व्हावी, असे विचार त्यांनी मांडले. प्रारंभी बाबूजी देशमुख वाचनालयाचे अध्यक्ष महादेवराव भुईभार यांनी प्रा. शम्सुद्दिन तांबोळी यांचे स्वागत केले. प्रा. नारायण कुळकर्णी कवठेकर यांनी वक्त्यांचा परिचय दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव अनुराग मिश्र यांनी केले. 
 
इस्लाममध्ये महिलांना समानतेचे स्थान 
इस्लाममध्ये महिलांना मानाचे, समानतेचे स्थान दिले असून, बुरखा, तलाक, जिहाद, याविषयी चांगले विचार सांगितलेले आहे. पण, नंतर सोयीप्रमाणे त्याचा अर्थ लावून त्याला पसरवले. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे कुराणात सापडणार नाही, असे पैगंबरांनी सांगितले आहे. पण, आज कुराणात जे आहे ते इस्लाम अन् जे नाही ते इस्लाम विरोधी असे मुस्लिम मानतात. श्रद्धा व्यवहार यात कालसापेक्षता ठेवा, असे पैगंबरांनी सांगितले. जो सर्वात जास्त सज्जन असले तर सर्वात चांगला मुसलमान, असे कुराणात सांगण्यात अाले आहे. 
बातम्या आणखी आहेत...