आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्याचे प्राध्यापक विद्यासागर झळकले अमेरिकन मासिकात, ‘सोप्या रोबोटिक्स’वर मुलाखत प्रकाशित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - येथील रालतो विज्ञान महाविद्यालयातील प्रा. दत्तराज विद्यासागर यांनी रोबोटिक्स हा क्लिष्ट विषय सोप्या पद्धतीने शिकवण्याची नवीन पद्धत निर्माण केली आहे. त्यांच्या या कार्याची अमेरिकन मासिकाने दखल घेतली आहे. या संदर्भातील त्यांची मुलाखत मासिकामध्ये प्रकाशित केली आहे. प्रा. विद्यासागर यांना मिळालेला हा बहुमान वैदर्भीयांसाठी गौरवशाली बाब आहे. 
 
इयत्ता वी पासून इंजिनीरिंग कॉलेजपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना हा विषय सोपा करून, आणि त्यातील प्रात्यक्षिकांवर भर देऊन ते हा विषय शिकवीत आहेत. मागील ७-८ वर्षांपासून विद्यासागर अकादमी अकोलांतर्गत, विदर्भातील विद्यार्थ्यांना हा विषय ते शिकवीत आहेत. आपले विद्यार्थी उच्च शिक्षणात कोठेही मागे राहू नये आणि रोबोटिक्ससारख्या आधुनिक विषयाचे त्याला शात्रशुद्ध शिक्षण मिळावे हा प्रा. दत्तराज विद्यासागर यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे. त्यांनी आतापर्यंत महाराष्ट्रात १०० पेक्षाही जास्त रोबोटिक्स विषयाच्या कार्यशाळा, शाळा आणि महाविद्यालयस्तरावर घेतल्या आहेत. विद्यार्थ्याच्या अंगी असलेले गुण हेरून, विविध कल्पक प्रोजेक्ट्स, विद्यार्थ्यांकडून बनवून घेण्यात विद्यासागर यांचे विशेष लक्ष असते. अकोलावासिय आणि विदर्भातील विद्यार्थ्यांसाठी त्यांचे हे प्रयत्न भूषणावह आहेत. 
 
इथे वाचा पूर्ण मुलाखत 
प्रा.दत्तराज विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली रोबोटिक्स विषयाचे प्राथमिक शिक्षण घेत, विद्यार्थ्यांनी GMRT-TIFR, National Innovation Foundation, Technothlon अशा विविध प्रकारच्या रोबोटिक्स स्पर्धांमध्ये बाजी मारली आहे. त्यांच्या यशस्वी प्रयत्नाची, अमेरिकेतील EEWEB या अभियांत्रिकी विषयाला वाहिलेल्या मासिकाने दखल घेतली. रोबोटिक्स मधील त्यांच्या सोप्या आणि शास्त्रशुद्ध शिक्षण प्रणालीचा गौरव करून मासिकाच्या website वर त्यांची मुलाखत नुकतीच प्रकाशित केली आहे. विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा घेण्यासाठी ही मुलाखत www.eeweb.com या website वर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांची www.vsagar.org ही वेबसाईट देखील आहे. 
बातम्या आणखी आहेत...