आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदणी झालेल्यांना ग्राप दरानेच कर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेत समाविष्ट झाल्या नंतर सोयी सुविधा तर मिळणार नाही, उलट करात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, या चिंतेने संबंधित गावातील नागरिकांना ग्रासले होते. मात्र हद्दवाढ झाल्या नंतर नियमानुसार दोन वर्ष ग्राम पंचायतीने आकारलेला करच वसुल केला जाणार आहे. परंतु ही सुविधा ज्या मालमत्ता धारकांनी मालमत्तेची नोंदणी केलेली आहे, त्यांनाच मिळणार असून ज्यांनी मालमत्तेची नोंदणी केलेली नाही, त्या नागरिकांना मात्र महापालिकेच्या नियमानुसार नोंदणी करावी लागणार आहे.
हद्दवाढी बाबत हालचाली सुरु झाल्यानंतर २४ गावातील ग्रामस्थांनी या प्रक्रियेला विरोध केला होता. महापालिकेची आर्थिक स्थिती योग्य नसुन नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा पुरविण्यास मनपा असमर्थ ठरली आहे, असा आरोप करुन हद्दवाढीला विरोध केला होता. यावेळी महापालिकेत समावेश झाल्यास कोणत्याही सोयी सुविधा मिळता केवळ करात भरमसाठ वाढ होईल, असे मत सर्व सामान्य नागरिकांसह राजकीय पुढाऱ्यांनी व्यक्त केले होते. आता प्रत्यक्ष हद्दवाढ झाल्यामुळे समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांमध्ये आता करात किती वाढ होणार या उत्सुकते बरोबरच चिंतेतही वाढ झाली आहे. परंतु तुर्तास १०० टक्के असे काहीही होणार नाही.

हद्दवाढी नंतर नियमानुसार ज्या मालमत्ता धारकांनी ग्राम पंचायतीकडे मालमत्तांची नोंदणी केली आहे. त्या मालमत्ता धारकांना ग्राम पंचायतीने आकारलेल्या कराचा भरणा दोन वर्ष करावा लागणार आहे. तर प्रत्येकाला मिटर लावावे लागणार असल्याने मीटर नुसार पाणीपट्टीचा भरणा करावा लागणार आहे.

नोंदणी करणारे तोट्यात : ज्यामालमत्ता धारकांनी ग्राम पंचायतीकडे मालमत्तेची नोंदणी केलेली नाही. त्यांना मात्र या सुविधे पासून वंचित राहावे लागणार आहे. या मालमत्ता धारकांच्या मालमत्तेची मोजणी करुन त्यांना महापालिकेच्या नियमानुसार कर आकारणी केली जाणार आहे. त्यामुळे ज्यांनी मालमत्ता नोंदणी केलेली नाही, ते तोट्यात जाणार आहेत.

बांधकामानुसार कर आकारणी : घराचेबांधकाम कोणत्या पद्धतीने केलेले आहे. त्यावर कराची आकारणी केली जाते. कर आकारणी ही गावठाण आणि गावठाण बाहेरील क्षेत्रानुसार केली जाते. गावठाण क्षेत्रातील टिनाचे घर, झोपडी, कच्ची घरे यांना २५ रुपये चौरस मिटर तर गावठाण बाहेरील याच पद्धतीच्या घरांना १५ रुपये चौरस मिटर दराने कर आकारणी केली जाते. तर सिमेंट कॉक्रिटच्या बांधकामासाठी गावठाण क्षेत्रातील मालमत्तांसाठी तळमजल्या करीता १५० रुपये, पहिल्या मजल्या करीता १३५ रुपये, दुसऱ्या मजल्या करीता १२० रुपये तर तिसऱ्या मजल्या करीता १०५ रुपये प्रति चौरस मिटर नुसार कर आकारणी केली जाते. व्यावसायीक मालमत्तांना मात्र वेगळे दर आहेत.

असा आकारला जातो कर : गावठाणक्षेत्रातील मालमत्ता धारकाकडे बांधकाम केलेल्या एकुण क्षेत्रफळाला प्रती चौरस फुट एक रुपया ५० पैसे या नुसार गुणायचे. आलेले उत्तर म्हणजे एका महिन्याचा कर. त्यामुळे आलेल्या उत्तराला पुन्हा वर्षाचे बारा महिने म्हणुन १२ ने गुणायचे. आलेले उत्तर म्हणजे वर्षभराचा कर. मात्र या रकमेतून मेन्टनन्सचे दहा टक्के वजा करायचे आणि राहिलेल्या रकमेच्या ५० टक्के रक्कम म्हणजे, त्या घराचा वार्षिक कर. वाणिज्य व्यवसायासाठी याच पद्धतीने कर आकारणी केली जाते. केवळ ५० टक्क्यांऐवजी ६९ टक्के कर आकारला जातो.
दोन वर्षाने २० टक्के वाढ
ज्या मालमत्ता धारकांनी मालमत्तांची नोंदणी केलेली आहे. जे नागरिक मालमत्ता कराचा भरणा करीत आहेत. अशा मालमत्ता धारकांना हद्द वाढी नंतर पहिले दोन वर्ष जुन्या पद्धतीने कराचा भरणा करावा लागणार आहे. तर त्यानंतर प्रत्येक वर्षी मालमत्ता करात २० टक्के वाढ केली जाणार आहे. महापालिकेच्या नियमानुसार कर निश्चित होई पर्यंतच ही २० टक्के वाढ राहणार आहे.
बातम्या आणखी आहेत...