आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराला काँग्रेस जनहित याचिकेद्वारे देणार आव्हान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मलकापूर गावाचा महापालिकेत समावेश झाल्या नंतर मलकापूरवासीयांना कोणत्याही मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. या उलट गावातील नागरिकांना अस्वच्छ गढुळ पाणीपुरवठा होत आहे. या बाबत महापालिकेला वारंवार या समस्येबाबत माहिती देऊनही शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी कोणताही प्रयत्न महापालिकेने केला नाही. या उलट आता मालमत्ता करवाढीचा बोजा मात्र नागरिकांवर टाकला जाणार आहे. या सर्व प्रकारामुळे मलकापूरवासी त्रस्त झाले असून सत्ताधारी गटाला झोपेतून जागे करण्यासाठी नगरसेवक मंगेश काळे यांच्या नेतृत्वात २९ मे रोजी महापालिकेवर घागर मोर्चा काढण्यात येणार आहे. 
 
मलकापूरला अकोला पाणीपुरवठा योजनेवर पाणीपुरवठा होत असे. मलकापूर ग्रामपंचायतीकडे पाणीपट्टी थकल्याने महापालिकेने हा पाणी पुरवठा बंद केला. मात्र, ऑगस्ट २०१६ हद्दवाढ झाल्याने मलकापूरचा समावेश महापालिकेत झाला. त्यामुळे मलकापूरला पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. मात्र महापालिकेने आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले आहे. अद्यापही या भागाला अकोला पाणी पुरवठा योजनेवरुन पाणीपुरवठा सुरु केलेला नाही. कुंभारी येथून मलकापूरला पाणीपुरवठा केला जातो. परंतु अस्वच्छ गढूळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. मलकापूर वासीयांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा तसेच अकोला पाणीपुरवठा योजनेवरुन हा पुरवठा करावा, असे वारंवार सांगूनही अद्याप पाणीपुरवठा सुरु झालेला नाही. या निषेधार्थ महापालिकेवर हा घागर मोर्चा काढला जाणार आहे, अशी माहिती नगरसेवक मंगेश काळे यांनी दिली आहे. 
 
अकाेलेकरांना मूलभूत सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेल्या महापालिकेने केलेल्या अतिप्रचंड मालमत्ता कराला काँग्रेस न्यायालयात जनहित याचिकेच्या माध्यमातून अाव्हान देणार अाहे. यासाठी मालमत्ता कराबाबत महापालिकेकडून नाेटीस मिळालेल्या ५० नागरिकांकडून याचिका दाखल करण्यात येणार अाहे. काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या रविवारी दुपारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात अाला. मालमत्ता कराबाबत व्यापक जनअांदाेलन उभारण्याचा निर्धारही बैठकीत करण्यात अाला. 

महापालिका निवडणुकीत अकाेलेकरांनी भाजपच्या पारड्यात भरभरुन मते टाकली. महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळल्याने अाणि केंद्र-राज्यातही भाजपची सत्ता असल्याने अाता काेणत्याही त्रास हाेता िवकासाची गंगा महानगरात अवतरेल, अशी अाशा अकाेलेकरांना हाेती. मात्र, शासनाकडून िवकास िनधीसाठी खेचून अाणण्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगत महापालिकेने मालमत्ता करामध्ये प्रचंड वाढ केली. ३० ते ६० टक्क्यांपर्यंत कर वाढ केल्याने सामान्यांचे कंबरडे माेडले. महापालिका स्वउत्पन्नातून अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही वेतनही देऊ शकत नाही. त्यामुळे स्वउत्पन्नातून विकास कामे करण्याचा प्रश्नच नाही. स्वउत्पन्नाचे स्त्राेत शाेधण्यात अपयशी ठरलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना पाेसण्यासाठी अामच्या खिशावर डल्ला का मारण्यात येत अाहे, खासदार, शहरातील दाेन अामदार भाजपचे असताना संपूर्ण विकासासाठी निधी खेचून का अाणल्या जात नाही, असे एक ना अनेक सवाल अाता नागरिकांमधून उपस्थित करण्यात येत अाहे. 

असे देण्यात येईल जाचक कराला उत्तर : मालमत्ताकरबाबत नागरिकांना महापलिकेकडून मिळालेल्या नाेटीसला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने अर्ज छापले अाहेत. यामध्ये अर्जदाराचे नाव, गट/वाॅर्ड क्रमांक, सन २०१६-१७मध्ये केलेल्या कराची अाकारणीचा समावेश राहणार अाहे. मनपाकडून कायद्यानुसार, नियमानुसार रस्ता, पाणी, शिक्षण, अाराेग्य, स्वच्छता, दिवे यासारख्या मूलभूत सुविधा मिळालेल्या नाहीत. त्यामुळे वाढीव कर मान्य नाही. यापूर्वी सन २००३ मध्ये लावण्यात अालेल्या कराचे विश्लेषण, अाताचे काराचे विश्लेषण करण्यात यावे. कर अाकारणीबाबतची विस्तृत माहिती (नकाशासह) नाेटीससाेबत देण्यात अालेली नाही. त्यामुळे या संपूर्ण कर रद्द करण्यात यावा, असेही या अर्जात नमूद करण्यात येणार अाहे. या उत्तरासाेबत जुन्या नवीन कराच्या पावतीची छायांकित प्रत जाेडण्यात येणार अाहे. संबंधित अर्जदारकडून कायदेशीर लढाई करण्यासाठी साजिद खान पठाण प्रदीप वखारिया यांना अधिकार देण्यात येत अाहे, असेही या उत्तरात नमूद करण्यात येणार अाहे. 

या माध्यमातून हाेईल आंदोलन जनजागृती 
मालमत्ता करवाढीला समाजातील जवळपास सर्वच घटकांमधून विराेध हाेत अाहे. गृहिणींचे अार्थिक बजेट काेलमडले असून, व्यावसाियकांची तिजाेरी रिकामी हाेणार अाहे. त्यामुळे महापािलकेच्या मनमानी कारभाराला विराेध करण्यासाठी काँग्रेसने पुढीलप्रमाणे व्यापक जनअांदाेलन भरण्याचा निर्णय रविवारी बैठकीत घेतला. 

१. संपूर्ण महानगरातील प्रत्येक प्रभागात जाऊन मालमत्ता करवाढीबाबत पाेस्टर्स लावण्यात येतील. 
२. प्रत्येक चाैकात मंडप, टेबल टाकून जनजागृती करण्यात येईल. 
३. महानगरात ठिकठिकाणी स्वाक्षरी अभियान राबवण्यात येईल. 
४. महापालिकेच्या प्रत्येक सभेत, कार्यक्रमात सत्ताधारी प्रशासनाला करवाढीसाठी जाब विचारण्यात येईल. 
५. भाजप लाेकप्रतिनिधींच्या घरासमाेर घंटानांद अांदाेलन करण्यात येईल. 

मलकापूरवासीयांना मूलभूत सुविधा नाही 
^मलकापूरचा महापालिकेत समावेश झाल्याने मलकापूरवासीयांना पाणी पुरवठा करणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे. मात्र त्याचा विसर पडला असून, केवळ मालमत्ता कर वाढवला आहे. सुविधांची मात्र बोंबाबोंब आहे. या विरुद्ध आता जनमत एकवटल असून, या मोर्चा नंतरही पाणी पुरवठा झाल्यास यापुढे तिव्र आंदोलन केले जाईल.’’ -मंगेश काळे, नगरसेवक शिवसेना. 
मालमत्ता करवाढीला विराेध करण्यासाठी काँग्रेसने शुक्रवारी धरणे दिल्यानंतर अांदाेलनाची पुढील दिशा निश्चित व्हावी, यासाठी रविवारी पदाधिकाऱ्यांची बैठक बाेलावली हाेती. पक्ष कार्यकर्त्यांच्या कार्यालयात झालेल्या या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांनी सूचना मांडल्या. सर्व सूचनांचा विचार करुन अांदाेलनाची पुढील दिशा निश्चित करण्यात अाली. कराला कडाडून विरोध करण्याची रणनिती ठरली. बैठकीला महासचिव राजेश भारती, महापालिकेचे विराेधी पक्ष नेते साजीद खान पठाण, प्रकाश तायडे, प्रदीप वखारीया, राजेश पाटील, अॅड. राजेश मते, सुषमा निचळ, पुष्पा गुलवाडे, प्रशांत भटकर, निखिलेश दिवेकर, अनंत बगाडे, विभा राऊत, नगरसेवक पराग कांबळे, दिलिप खत्री, सागर कावरे, सुरेश धाकुलकर, अजय भुईभार, निरज ठाकरे, महेंद्र गवई, दिनेश खाेब्रागडे, गणेश टाले अादी उपस्थित हाेते. 

करवाढ किती करावी याला मर्यादा हवी 
^करवाढीला कोणाचाही विरोध नाही. मात्र करवाढ किती टक्के करावी, याला मर्यादा आहेत. दर चार वर्षानी रिअसेसमेन्ट करावी लागते. हे काम महापालिकेचे आहे. ज्या अधिकाऱ्यांनी हे काम केले नाही, त्यांना जबाबदार धरता सर्व नागरिकांवर बोझा टाकला’’ शितल गायकवाड, गटनेता राष्ट्रवादी. 

मोठी वाढीव करवाढ मागे घ्यावी लागेल 
^भारिप-बमसंनेकरवाढीविरोधात राबवलेल्या स्वाक्षरी अभियानाला प्रतिसाद मिळाला. मात्र सत्ताधाऱ्यांनी नागरिकाच्या हाकेला साथ दिली नाही. ही वाढ सर्व सामान्यांवर बोजा टाकणारी आहे. त्यामुळेच ही करवाढ मागे घ्यावी लागेल.’’ अॅड.धनश्री अभ्यंकर-देव, गटनेता भारिप-बमसं. 

सत्ताधाऱ्यांना आम्ही सभेत धारेवर धरु 
^करवाढ काही प्रमाणात केली असती तर कोणाचाही विरोध नव्हता. तसेच हजारो मालमत्तांची नोंदणी झाली नव्हती. त्यामुळे काही प्रमाणात वाढ केली असती तरी चालले असते. त्यामुळे करवाढीच्या विरोधात सत्ताधारी गटाला धारेवर धरु.’’ राजेश मिश्रा, गटनेता शिवसेना 

सत्ताधाऱ्यांना जाब द्यावाच लागेल 
^करवाढीविरोधात अनेक तक्रारी दाखल केल्या आहेत. पक्ष हा जनतेवर अन्याय करण्यासाठी नसतो तर त्याना न्याय देण्यासाठी असतो. त्यामुळेच काँग्रेस सर्व सामान्य नागरिकांसोबत असून, मालमत्ता करवाढीविरोधात महासभेत जाव विचारला जाईल.'' -साजिदखान पठाण विरोधी पक्षनेता 
 
अकोला - मालमत्ताकर वाढीवरुन शहरात काहुर उठले असताना सत्ताधारी मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहेत. जनमानसात या करवाढी विरोधात रोष व्यक्त होत असल्याने आता विरोधकही सरसारवले आहेत. त्यामुळेच सोमवारच्या महासभेत मालमत्ता करवाढीवर चर्चा करुन ही करवाढ मागे घेण्याची मागणी विरोधक करणार आहेत. भारिप-बमसं, काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मुद्यावर एकत्र आले असून, या महासभेत मालमत्ता कर वाढीवरुन घमासान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

महापालिका निवडणुका होण्यापूर्वीच जीआयएस प्रणालीद्वारे मालमत्तांची नोंद मोजणीचे काम सुरु होते. मात्र निवडणुकीपूर्वी मालमत्ता करात वाढ केली जाईल अथवा यापूर्वी कर आकारणी झालेल्या घरातील बाल्कनी, जिना, शौचालय, बाथरुम, पॅरॉपिट वॉल आदींवर कर आकारणी कली जाईल तसेच कराच्य दरात वाढ केली जाईल, असे सत्ताधारी गटाने निवडणुकीपूर्वी केव्हाही सांगीतले नाही. त्यामुळेच नागरिकांनी या कामाला सहकार्यही केले. एवढेच नव्हे तर भाजपवर विश्वास ठेऊन एकहाती सत्ताही दिली. मात्र आता जवळपास सर्वच झोन मधील मालमत्ता नोंदणी आणि मोजणीचे काम पूर्ण झाल्यानंतर मालमत्ता कराच्या नोटीस बजावल्या आहेत. 

नागरिकांना भरमसाठ मालमत्ता कराचे देयक आल्याने आता अकोलेकर हबकून गेले आहेत. त्यामुळेच जनतेत रोष व्यक्त केला जात आहे. वाढलेल्या मालमत्ता करामुळे सर्व सामान्य अकोलेकरांचे कंबरडे मोडले आहे. पेईंग कॅपॉसिटी लक्षात घेता, ही करवाढ केल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. अद्याप केवळ पूर्व झोन मध्येच मालमत्ता कराच्य नोटीस बजावल्या आहेत. पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या तिन्ही झोन मध्ये अद्याप नोटीस बजावल्या नाहीत. त्यामुळे करवाढी विरोधातील लोण अद्याप या भागात पोचले नाही. त्यामुळेच सत्ताधारी गटाला या विरोधाची धार अद्याप कळलेली नाही. त्यामुळेच सत्ताधारी गटाला वठणीवर आणण्यासाठी महासभेत धारेवर धरण्याच्या निर्णय विरोधकांनी घेतला आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...