आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारिप-बमसंच्या जनआंदोलनात सहभागी व्हावे: अॅड.अभ्यंकर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेच्या अवाजवी मालमत्ता करविरोधात पक्ष प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात २८ जुनला जनआंदोलन केले जात आहे. शास्त्री मैदानावरुन सकाळी ११.३० मिनिटांनी महापालिकेवर मोर्चा काढला जाणार असून मागील वित्तीय प्रणालीनुसार ते कराचा भरणा करणार आहेत. या जनआंदोलनात नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन गटनेत्या अॅड.धनश्री अभ्यंकर यांनी केले आहे.
 
कोणत्याही सुविधा देता भरमसाठ करवाढ करणे ही सर्वथा चुकीची बाब आहे. त्यामुळेच सर्व सामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी अॅड.प्रकाश आंबेडकर स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. ते स्वत: त्यांच्या निवासस्थानाचा जुन्या पद्धतीने कर भरणार असून सर्व सामान्य अकोलेकरांनी या मोर्चात सहभागी होऊन मागील वित्तिय प्रणालीनुसार आपल्या निवासस्थानाचा कर भरावा, असे आवाहन अॅड.धनश्री अभ्यंकर, बबलु जगताप, किरण बोराखडे, माजी आमदार हरिदास भदे, माजी मंत्री डॉ.दशरथ भांडे, गजानन गवई, प्रतिभा अवचार, बुद्धरत्न इंगोले, रामा तायडे, अरुधंती शिरसाट, वंदना वासनिक, डॉ.प्रसन्नजित गवई, प्रविण पातोंड, विशाल पारेख, पराग गवई, संतोष मोहोड, सुनिता गजघाटे, सुवर्णा जाधव, डॉ.राजकुमार रंगारी, बबलु तिवारी आदींनी केले आहे.
बातम्या आणखी आहेत...