आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नाभिक समाजबांधवांनी दिले तहसीलदारांना निवेदन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्रस - अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील हातगाव (कांबी) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी ११ सप्टेंबर रोजी दिग्रस नाभिक समाज संघटनेच्या वतीने तहसीलदार किशोर बागडे यांना निवेदन देण्यात आले.
 
निवेदनात नमूद केले, की आरोपींवर कडक कारवाई करा, पीडित मुलीला शासनाच्या वतीने दहा लाख रुपयांची मदत द्यावी, पीडित कुटुंबाला पोलिस संरक्षण द्यावे, या केससाठी सरकारी वकील म्हणून अॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी, आदी मागण्या आहेत. 
 
अहमदनगर जिल्ह्यातील हातगाव (कांबी) येथील मुलीचे वडील नाभिक बांधव असून, शेतमजुरी करतात. २७ जुलै रोजी दुपारी वाजताच्या सुमारास त्यांची मुलगी तिच्या घरी एकटी असताना संभाजी शिवाजी भराट याने इयत्ता व्या वर्गात शिकणाऱ्या या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून दमदाटी, जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा दिग्रस तालुका शहर नाभिक समाज संघटनेने तीव्र निषेध निवेदनातून केला. दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. न्याय मिळाल्यास लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला. निवेदन देताना नाभिक समाज संघटना तालुकाध्यक्ष बाळा आंबेकर, उपाध्यक्ष नीलेश झामरे, सचिव प्रकाश दाभाडकर, कोषाध्यक्ष नागोराव वाघमारे, पुंडलिक राऊत, नागोराव वाघमारे, कैलास वाघमारे, गजानन वाघमारे, शेखर लांडगे, अशोक जाधव, पंकज तायडे, अशोक हरणे, बबन गोरे, रवी गोरे, गणेश शिंदे, संजय टोकसिया, ज्ञानेश्वर नक्षणे उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...