आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माध्यम संवाद : भविष्य निर्वाह निधीची सर्व कामे ऑनलाइन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भविष्य निर्वाह निधीसंदर्भात अकोला उपक्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने ग्राहकांच्या सुविधेसाठी अनेक नवीन योजना सुरू करण्यात आल्या अाहेत. भविष्य निर्वाह निधीसंदर्भातील सर्व कामे आता ऑनलाइन होणार असून, याला ग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन क्षेत्रीय भविष्य निधी आयुक्त मनोज कुमार यांनी केले. अकोला उपक्षेत्रीय कार्यालयात गुरुवार, १४ जानेवारी रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भविष्य निर्वाह निधीसंदर्भात सुरू करण्यात आलेल्या योजना, ऑनलाइन प्रक्रिया याबाबत माहिती दिली.

नवीन वर्षाच्या पहिल्या तारखेपासून इंटरनेट बँकिंग अत्यावश्यक करण्यात आलेले आहे. तसेच यूएएन सेवेमुळे पीएफबाबतचे सर्व व्यवहार ऑनलाइन आणि सोयीचे झाले आहे. ज्या ग्राहकांनी, कर्मचाऱ्यांनी अापला यूएएन बँक खात्याशी जोडून तो सक्रिय करून घेतला आहे, त्यांना याचा लाभ मिळत अाहे. विविध कार्यालयांत कामे करणाऱ्या कर्मचारी, पदाधिकाऱ्यांनी यूएएन सेवेशी जुडावे. फेब्रुवारी २०१६ पासून प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला अंशदान देणे अनिवार्य करण्यात आले आहे. पूर्वी ग्राहकांना देण्यात येणारी दिवसांची मुदत फेब्रुवारी २०१६ पासून बंद करण्यात येत असून, ऑनलाइन प्रक्रियेमुळे ही पाच दिवसांची मुदत संपुष्टात आणण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांनी प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला अंशदान द्यावे, असे त्यांनी आव्हान केले.
अकोला उपक्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यांतील पेन्शनधारकांच्या खात्यात महिन्याच्या पहिल्या तारखेला पेन्शन जमा होत आहे. मात्र, ज्या पेन्शनधारकांनी त्यांचा हयातीचा दाखला जमा केला नाही, अशांनी कार्यालयात जमा करावा. जेणेकरून त्यांची पेन्शन बंद होणार नाही. तसेच ज्या संस्थांनी त्यांचे कोड प्राप्तीसाठी अर्ज केला नसेल त्यांनी संस्थांची व्याप्ती निश्चित करावी. पाचही जिल्ह्यांतील शाळा, हॉटेल्स, हॉस्पिटल्स आणि बांधकामाधीन इमारत याबाबत माहिती संकलित करून, होणाऱ्या गैरप्रकाराबाबत कारवाई करण्यात येत आहे. काही संस्था या अंशदान देणी नियमित भरत नाही, चुकवतात. भविष्य निर्वाह निधी नियमित भरणाऱ्या, चुकवणाऱ्या संस्थांविरुद्ध भारतीय दंड सहितेच्या कलम ४०६/४०९ नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत कार्य सुरू झाले असून, संस्थांनी याबाबत खरी माहिती, निधी जमा करावा. भविष्य निर्वाह निधीबाबतच्या सर्व सुविधा ऑनलाइन झाल्या असून, ग्राहकांनी याबाबत जागरूक असावे, असे आवाहन त्यांनी केले.