आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंग करणाऱ्यास सहा महिन्यांची शिक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मुलगी शाळेत जात असताना तिच्याशी अश्लील वर्तन करणाऱ्या आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाने सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल जिल्हा सत्र न्यायाधीश (प्रथम) आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयाने मंगळवारी दिला.

माना पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या एका गावातील मुले-मुली कुरुमला शाळेत जातात. वाहनांची सोय नसल्यामुळे ते पायीच शेताच्या वाटेने शाळेत जातात. २९ जानेवारी २०१५ रोजी तिघी शाळकरी मुलीसोबत शाळेत जात होत्या. त्या गावंडे यांच्या शेताजवळ असताना त्यांच्या पाठीमागून गावातीलच श्रीकांत विठ्ठल आमले, वय २१, हा दुचाकीने आला. त्याने त्यातील एका मुलीचा हात पकडला मी तुझ्यावर प्रेम करतो असे म्हणून त्याने तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. मुलीने त्याला विरोध केला असता त्याने तिला धमकावले जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीने आरडाओरड केल्यानंतर श्रीकृष्ण आमले हा पळून गेला.
दुसऱ्या दिवशी पीडित मुलगी तिची आईने माना पोलिस ठाणे गाठून श्रीकृष्ण आमले विरुद्ध तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवी ३५४ अ, ५०६, पोस्को ११,१२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक कांताप्रसाद मिश्रा यांनी केला. त्यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश (प्रथम) आर.जी. वाघमारे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली.

न्यायालयाने या प्रकरणी सहा साक्षीदार तपासले.दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत भादंवी ३५४ नुसार तीन हजार रुपये दंड, ५०६ नुसार दोन हजार रुपये दंड पोस्को अॅक्ट नुसार सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. दंडाची रक्कम भरल्यास आरोपीला १५ दिवस अतिरिक्त कारावास सात हजार रुपये दंडाच्या रकमेपैकी सहा हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश दिले आहेत. सरकारपक्षाच्या वतीने सरकारी वकिल मंगला पांडे यांनी काम पाहिले.

पीडितेच्या दोन्ही मैत्रिणी झाल्या फितूर : घटनेच्यावेळी पीडित मुलीसोबत असलेल्या तिच्या दोन मैत्रिणीची साक्ष न्यायालयाने नोंदवली. या दोघीही न्यायालयात फितूर झाल्या. त्यामुळे पीडित तिची आई तपास अधिकारी कांताप्रसाद मिश्रा यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयात सरकारी वकिल मंगला पांडे यांनी केलेला युक्तीवादाच्या बळावर न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवत शिक्षा ठोठावली. पिडीत तिची आई, तपास अधिकाऱ्यांची साक्ष सरकारी वकीलाच्या युक्तिवादामुळे पिडीतेला न्याय मिळाला आहे.
बातम्या आणखी आहेत...