आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप नगरसेवकाने मनपा सभागृहात सोडले डुक्कर, अस्वच्छतेच्या मुद्यावरुन खडाजंगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप नगरसेवकाने डुकराचे पिल्लू सभागृहात आणले होते. - Divya Marathi
भाजप नगरसेवकाने डुकराचे पिल्लू सभागृहात आणले होते.
अकोला - महानगर पालिकेत बुधवारी सकाळी जे काही घडले त्याचा कोणी विचारही केला नव्हता. महासभेत भाजप नगरसेवक अजय शर्मा यांनी अस्वच्छतेचा मुद्दा उपस्थित करत चक्क सभागृहात डुक्कर आणले. शहरात साचलेला कचरा यावरुन भाजप नगरसेवक आणि महापौरांमध्ये खडाजंगी झाली. 
 
अकोल्यात भारतीय जनता पक्षाचीच सत्ता आहे. मात्र शहराच्या झालेल्या बकाल अवस्थेवर सत्ताधारी नगरसेवकांनीच गोंधळ घातला. नगरसेवक आणि महापौरांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. दुसरीकडे विरोधीपक्ष नेते साजिद खान पठाण यांनी टेबल फेकून या गोंधळात आणखी भर घातली. 
अकोला महापालिकेची बुधवारी सर्वसाधारण सभा होती. करवाढीच्या प्रश्नावरुन भारिप-बहुजन महासंघाचे प्रमुख अॅड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याआधीच सभागृहात सत्ताधारी नगरसेवकांनी कचऱ्याच्या प्रश्नावरुन गदारोळ घातला.
 
पुढील स्लाइडमध्ये, प्रकाश आंबेडकर भरणार त्यांच्या घराचा कर.. 
बातम्या आणखी आहेत...