आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'राजकारणा पलिकडचे..\' : संघर्ष यात्रेतील \'विरोधक\' नेत्यांचे खडसेंकडून गुलाब देऊन स्वागत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- भाेसरी भूखंड प्रकरणात मंत्रिपद गमवावे लागलेले भाजप नेते एकनाथ खडसे यांनी शनिवारी जळगाव जिल्ह्यात चक्क काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संघर्ष यात्रेचे आपल्या फार्म हाऊसवर स्वागत केले. यामुळे खडसेंच्या राजकीय हालचालींबद्दल वेगवेगळे तर्क मांडले जात आहेत.
 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधी पक्षाचे नेते पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथून दुसऱ्या टप्प्यातल्या संघर्षयात्रेला आजपासून (शनिवारी) सुरवात झाली आहे. रात्री ८.१५ च्या सुमारास मुक्ताई मंदिराच्या वाटेवर संघर्ष यात्रेचे एकनाथ खडसे यांच्या फार्म हाऊसवर स्वागत करण्यात अाले. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विराेधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, राजेश टाेपे, संजय पवार यांनी खडसे यांच्याशी कर्जमाफी, हमीभावसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर १५ ते २० मिनिटे चर्चा केली. या वेळी जिल्हा बंॅकेच्या अध्यक्षा राेहिणी खडसेही उपस्थित हाेत्या. संघर्ष यात्रेतील इतर मंडळी मुक्ताई मंदिरावर पाेहचली. 
 
राजकारणापलीकडचे संबंध...
दुपारी या नेत्यांचा फाेन अाला. त्यांचे स्वागत करण्यासाठी मुक्ताईनगरातच थांबलाे. माझे अनेकांशी राजकारणापलीकडचे संबंध अाहेत. 
- एकनाथ खडसे, भाजप नेते
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, संघर्षयात्रेच्या दुसर्‍या टप्प्यातील पहिल्या दिवसाविषयी, पाहा फोटो अखेरच्या स्लाइडवर पाहा VIDEO.. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...