आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडणीबहाद्दरांकडून विद्यार्थ्याची रॅगिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- इयत्ता १२ वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याला खंडणीबहाद्दरांनी चक्क रॅगिंग घेण्याचा प्रकार उजेडात आला आहे. जवाहरनगरमध्ये शिकवणीसाठी जाणाऱ्या या विद्यार्थ्याला गुरुवारी आठ ते दहा गुंडांनी सुरुवातीला पाच हजार रुपयांची खंडणी मागितली, विद्यार्थांने असमर्थता दाखवल्यामुळे या विद्यार्थ्याला हॉकीस्टिकने जबर मारहाण केली. याप्रकरणी हा विद्यार्थी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात आला असता, पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याला आल्यापावली परत पाठवले.
बुलढाणा जिल्ह्यातील एक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जवाहरनगरमध्ये खोली करून राहतो. या विद्यार्थ्याला एकटे गाठून १५ दिवसांपूर्वी चार ते पाच गुंडानी पैशाची मागणी केली. पैसे दिल्यास परिणामांना सामोरे जाण्याची धमकी त्याला दिली. आपले येथे कुणी नाही म्हणून विद्यार्थ्याने या गुंडाना १० हजार रुपये दिले. मात्र, त्यानंतर गुंड त्याला नेहमी त्रास देऊ लागले. त्याला उठबशा काढायला लावल्या. इतर त्रासही देऊ लागले. पुन्हा गुरुवारी या गुंडांनी विद्यार्थ्याला त्रास दिला आणि पाच हजार रुपयांची मागणी केली. त्याने नकार देताच त्याला लाथाबुक्क्यांनी आणि हॉकीस्टीकने मारहाण केली. तो दुपारी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात आला.
मात्र, पोलिसांनी त्याला आधीच का तक्रार केली नाही, इतके दिवस पोलिस दिसले नाहीत का, अशी विद्यार्थ्याची उलटतपासणी करत त्याच्या खच्चीकरणाचा प्रयत्न केला. याप्रकरणी गुन्हा दाखल होणे अपेक्षित असताना रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
बातम्या आणखी आहेत...