आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाडळी शिवारातील हातभट्टीचे अड्डे नष्ट; चौघे ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - अवैध रित्यागावठी दारूची निर्मिती करणाऱ्या हातभट्टीवर राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने धाड टाकून हे अड्डे नष्ट केले आहेत. या वेळी गावठी दारू काढणाऱ्या चार जणांना अटक करून त्यांच्या ताब्यातून १६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच माेह सडवा दारू जागीच नष्ट केला. ही धडक कारवाई शनिवार, १६ सप्टेंबर रोजी पाडळी शिवारात करण्यात आली. या कारवाईमुळे गावठी दारू काढणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
 
राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सुधाकर कदम यांच्या मार्गदर्शनात १५ १६ सप्टेंबर या दोन दिवसांत जिल्ह्यात अवैध दारू संदर्भात मास्क रेडचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, शनिवारी पाडळी शिवारातील देवीच्या मंदिराजवळील दरीमध्ये काही जण गावठी दारू काढत असल्याची माहिती भरारी पथकाला मिळाली. या माहितीवरून पथकातील कर्मचाऱ्यांनी धाड टाकली असता, पाडळी येथील भीमराव राजू मगर, सागर राजू मगर, संजय भीमराव पगारे अविनाश जाधव हे चार जण हातभट्टीची दारू काढताना दिसून आले. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली. यावेळी त्यांच्या ताब्यातून १५ हजार ७९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून मोहाचा सडवा दारू जागेवरच नष्ट केली. ही कारवाई भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक सुरेश चव्हाण, विशालसिंग पाटील अमोल सुसरे यांनी केली. या प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक चव्हाण करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...