आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांनी टाकली धाड, नागरिकांच्या तक्रारीवरून कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील अाणि जिल्हाधिकारी अास्तिककुमार पांडेय यांनी सापळा रचून गुरुवारी सायंकाळी एका रेशन दुकानावर कारवाई केली. अत्यंत गुप्तपणे केलेल्या या कारवाईत ७० कट्यांमधील ३५ क्विंटल ज्वारी जप्त करण्यात अाली. त्यापैकी ११ क्विंटल ज्वारी खाण्यास अयाेग्य असल्याचे चाैकशीदरम्यान स्पष्ट झाले अाहे. 
 
शिवणी परिसरात बंद स्थितीत असलेल्या निळकंठ सुतगिरणीजवळील स्वस्त धान्य दुकानावर ही कारवाई करण्यात अाली. धाड घातल्यानंतरची चाैकशी रात्री उशीरापर्यंत सुरूच हाेती. सदर दुकान हे महिला शिवनकला संस्थेद्वारे चालविले जाते. संस्थेच्या पदाधिकारी दुकानाच्या वेळा पाळत नसून गहू, तांदुळाच्या खरेदीसाठी निकृष्ठ ज्वारीच्या खरेदीची गळ घातली जाते, अशी नागरिकांची तक्रार हाेती. याच तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांनी गुप्त सापळा रचला. तक्रारदार यापूर्वीच पालकमंत्र्यांपर्यंत पाेहचले हाेते. त्यामुळे त्यांनीही या प्रकरणात लक्ष घातले. त्यानंतर या दाेघांनीही एकाच वेळी या दुकानावर धाड घातली. या वेळी दुकानात धान्य विक्री सुरु हाेती. 
पालकमंत्री अाणि जिल्हाधिकारी दुकानात पाेहचल्याचे पाहून अाणखीही काही नागरिकांनी गर्दी केली. अाठ-अाठ दिवस दुकान उघडले जात नाही, गहू -तांदुळ देताना ज्वारीचा अाग्रह केला जाताे, दुकानदार महिलांची वागणूक याेग्य नाही, अशा त्यांच्या तक्रारी हाेत्या. हे एेकत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी ज्वारीचा नमूना घेऊन तेथे असलेले ७० कट्टे जप्त केले. प्राथमिक चाैकशीअंती त्यातील २२ कट्टे निकृष्ठ असल्याचे निरिक्षण अधिकारी महेंद्रकुमार अातराम यांचे म्हणणे अाहे. 

चाैकशी अंती कारवाई करू 
^दुकानातील अनियमितता अाणि धान्य साठ्याच्या चाैकशीचे निर्देश देण्यात अाले अाहे. तहसीदार राजेश्वर हांडे यांना त्यासाठी प्राधिकृत करण्यात अाले असून त्यांच्या अहवालानंतर याेग्य कारवाई केली जाईल. अास्तिक कुमारपांडेय, जिल्हाधिकारी. 
बातम्या आणखी आहेत...