आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लुटारूंच्या टाेळ्या सक्रिय, रेल्वेचे प्रवासी असुरक्षित, रेल्वेस्थानक परिसरातील रहिवासीही झाले त्रस्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - रेल्वे प्रवाशांना लुटणाऱ्या टाेळ्या पूर्वीच्या तुलनेने सक्रिय झाल्या अाहेत. परिणामी, रेल्वेस्थानक परिसर असुरक्षित झाला अाहे. यावर बुधवारी रात्री लुटण्याच्या घटनेच्या निमित्ताने शिक्कामाेर्तब झाले अाहे. लुटमार राेखण्यासाठी प्रशासनाने ‘अॅक्शन प्लॅन’तयार करावा आणि अंमलबजावणी करावी, अशी मागणी प्रवाशांमधून हाेत अाहे.
अकाेटफैलसह परिसरात प्रवाशांना लुटणाऱ्या टाेळ्याच सक्रिय अाहेत. गुन्हेगारी जगतावर वर्चस्व अबाधित राहावे, यासाठी सन २००८ ते २०१० या कालावधीत टाेळी युद्ध भडकले हाेते. या काळात दाेन्ही टाेळ्यांमधील प्रत्येकी एकाचा खूनही करण्यात अाला. पाेलिसांनी टाेळ्यांच्या मुसक्या अावळल्याने गुन्ह्याचा अालेखही कमी झाला हाेता. त्यानंतर दाेन्ही टाेळ्यांमध्ये समेटही झाला. ‘अर्थपूर्ण’ व्यवहारानंतर साक्षीदार उलटले. पुराव्यांअभावी अाराेपींची सुटका झाली. नंतर अाराेपींविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीअंतर्गत गुन्हे दाखल झााले. त्यानंतर अाराेपी सुटल्याने पुन्हा टाेळ्या सक्रिय झाल्या. या टाेळ्यांचा त्रास अाता रेल्वेस्थानकाजवळील रहिवाशांनाही होत अाहे. त्यामुळे या टाेळ्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणी हाेत अाहे.

अशीही विभागणी
रेल्वेच्या प्रवाशांना लुटणाऱ्या टाेळ्यांमध्ये काेणी कुठे काम फत्ते करायचे, यावरून वाद हाेतात. त्यामुळे टाेळ्यांनी डाऊन लाइन अशा पद्धतीने विभागणी केली. शंका येऊ नये, यासाठी टाेळ्यांमध्ये महिलांना सक्रिय करून घेण्यात अाले अाहे.

खाद्य पदार्थांची होते चढ्या दराने विक्री
रेल्वेस्थानकावर खाद्य पदार्थांची जास्त दराने विक्री हाेते. अवैध विक्रेतेही सक्रिय अाहेत. या माध्यमातूनही टाेळ्या सक्रिय असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. रात्री जाणे-येणे करणाऱ्या प्रवाशांची लूट हाेण्याचे प्रमाण जास्त अाहे.

लहान मुलांचाही होतो गुन्हेगारीसाठी वापर
अल्पवयीन मुलांना शिक्षेची तरतूद नसल्याने टाेळ्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा केला जातो. मुलांवर काेणी लवकर संशय घेत नसल्याने अाणि ती गर्दीच्या ठिकाणाहून सहज बाहेर पडू शकत असल्याने टाेळ्या त्यांचा वापर करून घेत असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे.
रेल्वेस्थानकावर साहित्य तपासण्याची मशीन बंद असते. तिकीट चेकर नसतो.

टाेळ्यांचे प्रमुख बनले भूखंड माफिये
सूत्रांनीिदलेल्या माहितीनुसार एका टाेळीचा प्रमुख तर अाता भूखंड माफिया झाला अाहे. भूखंड बळजबरीने विकत घेणे, खरेदी करून देण्यासह भूखंडाशी निगडित व्यवहारात हा टाेळीचा प्रमुख माेलाची भूमिका बजावत अाहे. काही महिन्यांपूर्वी तर भूखंड व्यवहारातून अकाेट राेडवर एका जमीन मालकाचा खूनही झाला हाेता.

रेल्वेने सतर्क राहणे गरजेचे
टाेळीतील सदस्य रेल्वेस्थानकावर फिरत असतात. स्थानकावर फिरणाऱ्या प्रत्येकाला प्लॅटफाॅर्म प्रवासाच्या तिकिटासह विचारणा हाेणे अावश्यक अाहे. मात्र, प्रत्येकाची विचारपूस हाेतेच असे नाही. त्यामुळे या टाेळीला पायबंद घालण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी हाेत अाहे.
बातम्या आणखी आहेत...