आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पावसाची पुन्हा दमदार हजेरी, जलप्रकल्पात होणाार वाढ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने ११ ऑगस्टला सायंकाळी सर्वत्र पुन्हा दमदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पात वाढ होण्याची शक्यता आहे. जून महिन्यात हजेरी लावल्यानंतर संपूर्ण जुलै महिन्यात पावसाने विश्रांती घेतली. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पातील जलसाठ्याची पातळी घटली होती. परंतु, चार ऑगस्टपासून अकोला वाशीम जिल्ह्यात पावसाने सलग दोन दिवस रेकॉर्डब्रेक हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिक सुखावले होते. प्रकल्पाच्या पातळीतही वाढ झाली. पावसामुळे शहरातील अनेक वस्त्यात पाणी शिरले, तर पिकेही पाण्याखाली गेली. अनेक ठिकाणी पुलावरून पाणी वाहिल्याने काही गावांचा संपर्कही तुटला होता. परंतु, सहा ऑगस्टला पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर काही ठिकाणी पावसाने तुरळक प्रमाणात हजेरी लावली. दरम्यान, वेधशाळेने २४ तास अतिवृष्टीचा इशारा दिला होता. परंतु, या इशाऱ्या दरम्यान पावसाने दडी मारली. ११ ऑगस्टला रात्री साडेसातच्या सुमारास पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली.