आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकाेट अन् मूर्तिजापूरमध्ये पावसाने उडवली दाणादाण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - शहरात पावसाचे प्रमाण अल्प असतानासुद्धा सातपुडा पर्वताच्या कुशीत पडलेल्या पावसामुळे मोहाळी नदीला पूर येऊन अकोट-हिवरखेड मार्गावरील वाहतूक बंद होण्याचा प्रकार २७ जून रोजी घडला.
आज सकाळपासून सातपुडा पर्वताच्या कुशीत बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शहरालगत वाहणाऱ्या मोहाळी नदीला पूर आला. या पुराने अकोट-हिवरखेड मार्गावरील वाहतूक दुपारच्या दरम्यान बंद झाली. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आतापर्यंत या वर्षी पहिल्याच पुरामुळे वाहतूक बंद होण्याचा प्रकार घडला असला तरी वर्षातून सात ते आठ वेळा पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक बंद पडते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : अकोटमार्गे जळगाव जामोदकडे जाणारे राज्य महामार्गावरील प्रवासी बसेससह मालवाहू वाहनांचीही मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू असते. मात्र, या मार्गावरील मोहाळी नदीवरील पूल अत्यंत ठेंगणा अरुंद आहे. या पुलाच्या नवीन निर्मितीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याला अनेक वेळा नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी निवेदन दिले आहे. मात्र, नवीन पुलाची निर्मिती रखडल्याने वर्षातून बऱ्याच वेळा या मार्गावरील वाहतूक बंद होते.

रुग्णांची गैरसोय : जळगावजामोद, तेल्हारा, हिवरखेड, अडगाव आदी भागातील रुग्णांना हॉस्पिटलमध्ये हलवयाचे असल्यास अकोटमार्गे जावे लागते. मात्र, या पुलामुळे वाहतूक बंद असल्यास रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. निंबा फाटा मार्गे पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. मात्र, हिवरखेड परिसरातील गावांना अकोट मार्गे जाणे जास्त सोईस्कर आहे. त्यामुळे या पुलाच्या निर्मितीसाठी त्वरित प्रयत्न करणे गरजेचे आहे.
माेहाळीनदीच्या पुलावर पुराचे पाणी असल्यास दुचाकीस्वार रेल्वेच्या रुळावरून दुचाकी चालवतात. रेल्वे मार्गावरील पूल उंच असल्यामुळे तो मार्ग कधीच बंद पडत नाही. मात्र, दुचाकीस्वाराचे हे स्टंड जीवघेणे ठरू शकते.

माेहाळी नदीच्या पुलावर पुराचे पाणी असल्यास दुचाकीस्वार रेल्वेच्या रुळावरून दुचाकी चालवतात. पूल उंच असल्यामुळे तो मार्ग कधीच बंद पडत नाही. मात्र, दुचाकीस्वारांचे हे स्टंट जीवघेणे ठरू शकते.
बातम्या आणखी आहेत...