आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात दिवसभर सर्वत्र पाऊस; ७० टक्के पेरण्या आटोपल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - हवामान विभागाचा अंदाज रविवारी अचूक ठरला. जिल्ह्यात दिवसभर पाऊस बरसत राहिला. मुसळधार पाऊस चौफेर झाल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत चांगला पाऊस झाल्याची माहिती महसूल यंत्रणेने दिली. जून महिन्यात काही प्रमाणात अत्यल्प पाऊस झाला होता. मात्र, चालू आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस झाला. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या, त्या या पावसाने पिकांना संजीवनीच मिळाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. पावसाचा हा जोर दिवसभर रात्री कायम राहिल्याने शहरातील बहुतांश सखल भागात पाणी साचले असून, परिसरातील नदी, नाले, ओढे तुडुंब वाहत होते. जिल्ह्यात आतापर्यंत ७० टक्के पेरण्या आटोपल्या. जिल्ह्यात लाख ८२ हजार हेक्टर पेरणी क्षेत्र असून, केवळ तीस टक्केच पेरण्या बाकी असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले.
नियंत्रण कक्ष वाऱ्यावर
आपत्ती निवारणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. पण रविवारी या ठिकाणी सायंकाळी एकही कर्मचारी आढळून आला नाही. याशिवाय कंट्रोल रूमचा दूरध्वनीसुद्धा कुणी उचलत नाही. त्यामुळे नागरिकांना आपल्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी अडचण निर्माण होते. जिल्हाधिकारी महोदयांनी याची दखल घेऊन कर्मचाऱ्यांना समज देण्याची गरज निर्माण झाली आहे.
बातम्या आणखी आहेत...