आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्तिजापूर तालुक्यात जोरदार पाऊस, ४० ते ५० घरांची पडझड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूर्तिजापूर - शहर सकाळी उन्हाच्या दाहकतेत तापत असताना आज दुपारच्या सुमारास पावसाने अचानक हजेरी लावली. जोरदार पावसाच्या हजेरीमुळे मूर्तिजापूर तालुक्यातील राजनापूर, खिनखिनी, अकोली जहाँगीर या गावातील घरांची पडझड झाली. जवळपास ४० ते ५० घरांचे यामध्ये नुकसान झाल्याची माहिती आहे. तहसीलदार राहुल तायडे यांनी सर्व्हेक्षणासाठी गावांमध्ये टीम पाठवली आहे. 
 
शनिवारी ढगाळ वातावरणाने आभाळ काळोख होऊन जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे उकड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र, ४० ते ५० घरांची पावसामुळे पडझड झाली आहे. खरीप हंगामाच्या दिशेने शेतकरी वाटचाल करण्यास मोकळा झाला. तालुक्यातील काही भागात चांगलाच पाऊस बरसला असून, उन्हामुळे लाही लाही होताना पावसामुळे मात्र नागरिक सुखावले. पावसासह विजेचा कडकडाट होत असताना जोरदार वारादेखील सुटला. दरम्यान, वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. सदर पाऊस नगरपरिषद ला मान्सूनपूर्व साफसफाई महावितरणला मान्सूनपूर्व मेन्टन्स देखभालीसाठी अलर्ट करणारा ठरला. ऐन पावसाळ्यात कुठेही दुर्घटना गैरसोय होऊ नये म्हणून दोन्ही विभागाने तत्परतेने नियोजन करणे गरजेचे आहे. पहिल्याच पावसाने देवरन रोडवरील नाल्याचे पाणी रस्त्यावर आले. ज्यामुळे नगरपरिषदेच्या कार्यप्रणालीवर शहराच्या स्वच्छते संबंधी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...