आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोलेकर झाले ओलेचिंब; मात्र जलप्रकल्प अजूनही तहानलेलेच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पावसाने जुलै महिन्यात घेतलेल्या दीर्घ विश्रांतीनंतर ऑगस्टला दमदार हजेरी लावली. पहाटेपासूनच शहरासह जिल्ह्यात सर्वत्र दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले, तर ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदानावरही परिणाम झाला. या पावसामुळे खरिपातील पिकांना जीवदान मिळाले. परंतु, जलप्रकल्प मात्र अद्यापही तहानलेलेच आहेत. त्यामुळे जलसाठ्यात वाढ होण्यासाठी जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जून महिन्याच्या प्रारंभी शहरासह जिल्ह्यात चांगला पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाने सतत हुलकावणी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले. जून महिन्याच्या अखेरीस काही भागात पावसाने पुन्हा हजेरी लावली. परंतु, जुलै महिन्यात मात्र पावसाने ठेंगाच दाखवला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना तिबार पेरणीचा सामना करावा लागला. एकीकडे पावसाअभावी शेतकरी हतबल झाले, तर दुसरीकडे जलप्रकल्पांनीही मृतसाठ्याची पातळी गाठली. त्यामुळे १५ जुलैपर्यंत केलेले पाणी वाटपाचे नियोजनही कोलमडले. मध्यम तसेच लघू प्रकल्पांनी मृतसाठ्याची गाठलेली पातळी अद्यापही भरून निघालेली नाही. परंतु, ऑगस्टला पहाटेपासून सुरू झालेल्या पावसामुळे मात्र शेतकऱ्यांसह नागरिक सुखावले. ऑगस्टला पहाटे वाजल्यापासूनच पावसाच्या हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्यास प्रारंभ झाला. दिवसभर पाऊस सुरू होता. त्यामुळे शहराच्या सखोल भागात पाणी साचले, तर शहरातील मोठ्या नाल्यांची साफसफाई झाल्याने तुंबलेल्या नाल्यांमधील पाण्याने रस्त्यावर ठाण मांडले.
पुढील स्‍लाईडवर क्‍लिक करा, जाणून घ्‍या विस्‍तृत माहिती..