Home | Maharashtra | Vidarva | Akola | rain in akola

सकाळी पडतो पाऊस, दुपारी प्रचंड उकाडा अन् रात्री गारवा

प्रतिनिधी | Update - Oct 10, 2017, 11:42 AM IST

काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या जिल्हावासीयांना साेमवारी पहाटेपासूनच पावसाने दिलासा देण्यास सुरुवात केली. पहा

 • rain in akola
  अकाेला- काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या जिल्हावासीयांना साेमवारी पहाटेपासूनच पावसाने दिलासा देण्यास सुरुवात केली. पहाटे पासून रिमझिम पावसाला प्रारंभ झाला. जिल्ह्यात सर्वाधिक ३२ मि.मी. पावसाची नोंद तेल्हाऱ्यात झाली असून, जिल्ह्यातील इतर भागातही पावसाने हजेरी लावली.

  गत काही दिवसांपासून तपामानात वाढ झाल्याने अकाेलेकर त्रस्त हाेत अाहेत. दुपारी तर शरीरातून धामांच्या धाराही वाहतात. रविवारी सकाळी ११ नंतर काही वेळ ऊन पडले. त्यानंतर दुपारी काही वेळ पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात थंडावा निर्माण झाला हाेता. साेमवारी पहाटे पावसाला प्रारंभ झाला. काही भागात रात्री उशिरापर्यंतही पाऊस सुरु हाेता.

  येथेलावली पावसाने हजेरी
  पावसाने साेमवारी अकाेला शहरात हजेरी लावली. त्यानंतर दुपारी ऊन पडले. संध्याकाळनंतर शहरात पुन्हा दमदार हजेरी लावली. पावसाने पातूर तालुक्यांतील अनेक गावांसह शिर्ला, वाडेगाव येथे पाऊस झाला. तसेच हातरूण, दुधाळा, शिंगाेली, मालवाडा, कंचनपूर, निमकर्दा, निंबा परिसरात पाऊस झाला.

  पाल्यांचीमजा; पालकांची तारांबळ: अकाेलाशहरात सकाळी रिमझिम पाऊस झाला. सकाळी शाळेची वेळ असल्याने पालक पाल्यांना स्कूल बस, अॅटाेरिक्षाची वाट पाहत रस्त्यावर उभे हाेते. पाऊस सुरु झाल्याने पालक सुरक्षित ठिकाण शाेधत हाेतेे, तर पाल्य भिजण्याचा अानंद घेत हाेते. अनेक चिमुकले तर अाेलेचिंब झाले. त्यामुळे पालकांनी त्यांना शाळेत पाठवता घरी न्यावे लागले. नंतर मात्र काही पालकांनी स्वत: पाल्यांना शाळेत साेडून दिले.

  अातापर्यंत३ ९६१.९ मि.मी. पावसाची नाेंद: जिल्ह्यातअाॅक्टाेबरपर्यंत ३९६१.९ मि.मी. पावसाची नाेंद करण्यात अाली अाहे. अकाेला तालुका-५१२.०, बार्शि टाकाळी-५०७, अाकाेट-४५०.६, तेल्हारा-६५० बाळापूर:- ६५१, पातूर-४८६ मूर्तिजापूर तालुक्यात ७०४ मि.मी. पावसाची नांेद करण्यात अाली. या पावसाचा रब्बीला फायदा होणार आहे.

Trending