आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गतवर्षीच्या तुलनेत यंदा झाला २० %जास्त पाऊस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - सतत तीन वर्ष दुष्काळाच्या झळा साेसलेल्या जिल्हावासीयांना यावर्षी वरूणराजाने दिलासा दिला असून,गतवर्षीच्या तुलनेने यंदा २० टक्के जादा पाऊस झाला अाहे. गतवर्षी ३० सप्टेंबर राेजी वार्षिक सरासरीच्या पावसाच्या तुलनेत प्रत्यक्ष पडलेल्या पावसाची टक्केवारी ९४.०६ टक्के हाेती, हीच टक्केवारी यंदा अर्थात ३० सप्टेंबर २०१६ राेजी ११३.५६ एवढी अाहे. जून ते सप्टेंबर या चार महिन्यात झालेल्या पावसामुळे पिण्याच्या पाण्याचा अाणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तुर्तास मिटला अाहे. मात्र काही ठिकाणी पाऊस वेळेवर पडल्याने अाणि काही ठिकाणी अवेळी पडलेल्या पावसामुळे शेतमलाचे उत्पादन घटणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे अाहे.
गत तीन वर्षांपासून जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत अाहे. गत तीन वर्षात तर शेतमालाचे उत्पादन कमालीचे घटल्याने अनेक शेतकऱ्यांचा मशागत पेरणीचाही खर्च भरून निघाला नाही. कधी खरीप हंगाम हातून गेला तर गारपीट-अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकं पाण्यात गेले. त्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा डाेंगर कमी हाेण्याएेवजी वाढतच गेला. निसर्गाच्या लहरीपणामुळे भूजल पातळीही घटली. जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाल्याने टंॅकरने पाणी पुरवठा करण्यात अाला हाेता. जनावरांच्या पिण्याच्या अािण चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला हाेता.

दरम्यान, यंदा गतवर्षीच्या तुलनेने जादा पाऊस हाेणार, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली हाेती. त्यानुसार सरासरी चार महिने पावसाळा गृहित धरल्यास जून ते सप्टेंबर या चार महिन्यात यंदा जिल्ह्यात ७९१.८ मि.मी. पाऊस पडला असून, ही वार्षिक सरासरी ११३.५६ टक्के अाहे.

..तरचरब्बी पिकांना दिलासा
यंदाजून जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली. मात्र १० अाॅगस्टनंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक तालुक्यातील साेयाबीन पिकाला फटका बसला. सध्या बहुता:श शेतकऱ्यांनी मुगाचे पिक घरी अाणले असून, उडीदाचे साेंगणे सुरु केले अाहे.

काही ठिकाणी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कपाशी पिकांचे नुकसान झाले. सध्या साेयाबीनचे पिक साेंगण्यास प्रारंभ झाला अाहे. काही ठिकाणी हार्वेस्टरच्या साह्याने पिक साेंगण्यात येत अाहेत.

परतीच्या पावसामुळे तूर पिकाची नासाडी हाेणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे अाहे. सध्या पाऊस थांबल्यास अाणि रब्बीसाठी मशागत झाल्यानंतरच पाऊस अपेक्षितनुसार पडल्यास त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना हाेईल, असा दावाही शेतकऱ्यांमधून हाेत अाहे.
यंदागतवर्षीच्या तुलनेने जादा पाऊस हाेणार, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली हाेती. त्यानुसार सरासरी चार महिने पावसाळा गृहित धरल्यास जून ते सप्टेंबर या चार महिन्यात यंदा जिल्ह्यात ७९१.८ मि.मी. पाऊस पडला असून, ही वार्षिक सरासरी ११३.५६ टक्के अाहे.

..तरच रब्बी पिकांना दिलासा
यंदा जून जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली. मात्र १० अाॅगस्टनंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक तालुक्यातील साेयाबीन पिकाला फटका बसला. सध्या बहुता:श शेतकऱ्यांनी मुगाचे पिक घरी अाणले असून, उडीदाचे साेंगणे सुरु केले अाहे. काही ठिकाणी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे कपाशी पिकांचे नुकसान झाले. सध्या साेयाबीनचे पिक साेंगण्यास प्रारंभ झाला अाहे. काही ठिकाणी हार्वेस्टरच्या साह्याने पिक साेंगण्यात येत अाहेत. परतीच्या पावसामुळे तूर पिकाची नासाडी हाेणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे अाहे. सध्या पाऊस थांबल्यास अाणि रब्बीसाठी मशागत झाल्यानंतरच पाऊस अपेक्षितनुसार पडल्यास त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना हाेईल, असा दावाही शेतकऱ्यांमधून हाेत अाहे.
१३५ मि.मी. जास्त पडला पाऊस
गतवर्षीच्या तुलनेेने यंदा जिल्हयात १३५.९ मि.मी. जादा पाऊस पडला. गतवर्षी जून ते ३० सप्टेंबर या चार महिन्यात ६५५.९० मि.मी. पाऊस पडला हाेता. यंदा जून ते ३० सप्टेंबर २०१६पर्यंत ७९१.८ मि.मी. पाऊस पडला. यंदा जून ते ३० सप्टेंबर या कालावधीत सरासरी ६९७.३ मि.मी. पाऊस पडणे अपेिक्षत हाेते. मात्र यंदा जिल्हयात ३० सप्टेंबरपर्यंत ७९१.८ एेवढा पाऊस पडला.

२०१६ या वर्षात जिल्ह्यात वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्ष ११३.५६ टक्के पाऊस झाला. पावसाचे तालुकानिहाय चित्र पुढीलप्रमाणे अाहे.
२०१५ या वर्षात जिल्ह्यात वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत प्रत्यक्ष ९४.०६ टक्के पाऊस झाला. पावसाचे तालुकानिहाय चित्र पुढीलप्रमाणे अाहे.

बातम्या आणखी आहेत...