Home | Maharashtra | Vidarva | Akola | Raj Thackeray Party Workers Targets On Agriculture office in Yawatmal

यवतमाळ येथे मनसे कार्यकर्त्यांचा राडा; जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात केली तोडफोड

दिव्य मराठी वेब टीम | Update - Oct 11, 2017, 04:42 PM IST

यवतमाळ- जिल्ह्य़ात कीटकनाशक फवारणीतून शेकडो शेतकर्‍यांना विषबाधा झाली आहे. आतापर्यंत 20 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. या

 • Raj Thackeray Party Workers Targets On Agriculture office in Yawatmal
  यवतमाळ- जिल्ह्य़ात कीटकनाशक फवारणीतून शेकडो शेतकर्‍यांना विषबाधा झाली आहे. आतापर्यंत 20 शेतकर्‍यांचा मृत्यू झाला आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसेच्या संतप्त‍ कार्यकर्त्यांनी ययतमाळ येथील जिल्हा आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयात तोडफड केली. शेतकरी मृत्यूमुखी पडत असताना कृषी अधिकारी झोपा काढत होते काय? असा सवाल ही मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वर्ध्यात येतात. परंतु शेजारी यवतमाळ जिल्ह्यात येत नाही हे या राज्याचे दुर्देव असल्याचे मनसेने म्हटले आहे.

  कार्यालयात घुसून तोडफोड
  मनसेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी सकाळी कृषी अधिकारी कार्यालयात घुसून तोडफोड केली. खुर्च्या फेकून, टेबलवरील काच फोडली. कीटकनाशकांच्या फवारणीनंतर यवतमाळ जिल्ह्यासह राज्यात 34 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

  चिनी बनावटीचे फवारणी पंप बाजारात...
  - याप्रकरणाची चौकशी केल्यानंतर यामागे चिनी बनावटीचे फवारणी पंप असल्याचे समोर आले आहे.
  - प्रशासनाकडून विषबाधा प्रकरणाचा शोध घेतला जात आहे. देशी बनावटीचे फवारणी पंप किंवा बॅटरीवर चालणारे स्वयंचलित पंप यांसोबत आता चिनी बनावटीचे फवारणी पंपही सध्या बाजारात उपलब्ध आहेत.
  - या पंपच्या सहाय्याने कमी वेळात जास्त एकराची फवारणी करता येते. त्यामुळे या पंपांना जास्त मागणी असल्याचे समोर आले आहे.
  - पेट्रोलवर चालणारा हा चिनी पंप मोठ्या प्रमाणात तूषार फेकतो. या पंपातून निघणारे तूषार हलके असल्याने ते हवेत जास्त काळ राहतात.
  - शेतकऱ्यांनी पुरेशी काळजी घेतलेली नसेल तर यातूनच विषबाधा होते, असा निष्कर्ष समोर आला आहे.

  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... यवतमाळमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी असा केला राडा..
 • Raj Thackeray Party Workers Targets On Agriculture office in Yawatmal
 • Raj Thackeray Party Workers Targets On Agriculture office in Yawatmal
 • Raj Thackeray Party Workers Targets On Agriculture office in Yawatmal

Trending