आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसवाल्यांना संविधान का समजले नाही- आठवलेंचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा- केंद्रातील सरकार हे आरएसएसचे नसून मोदींचे आहे. मोदी संविधानाप्रमाणे वागतात म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत. संविधान किती श्रेष्ठ आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे एक चहा विकणारा पंतप्रधान झाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विनम्रपणे सांगतात. मग काँग्रेसवाल्यांना संविधान का समजले नाही, असा सवालही खासदार रामदास आठवले यांनी रविवार, २४ एप्रिल रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केला.

या वेळी त्यांनी मोदी सरकार दलितांचे आरक्षण काढू पाहत असल्याच्या चर्चा आहे. मात्र असे काहीच नाही. पण आरक्षण आणि संविधान बदलू पाहणाऱ्यांना आम्ही रस्त्यावर उतरून बदलवून टाकू, असा इशाराही त्यांनी दिला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ जयंतीनिमित्त रिपाइंच्या वतीने २६ जानेवारीपासून कन्याकुमारी ते महू ‘जाती तोडो, समाज जोडो भारतभीम रथयात्रा’ आयोजित केली आहे. या यात्रेचे रविवारी बुलडाण्यात आगमन झाले. या वेळी आयोजित पत्रपरिषदेत बोलताना खासदार आठवले म्हणाले, विदर्भावर वेळोवेळी अन्याय झाला आहे. विदर्भात सिंचनाचा अनुशेष बाकी आहे. नुसती धरणे बांधून चालणार नाहीत. त्यासाठी नदीजोड प्रकल्प राबवणे गरजेचे आहे. हे प्रकल्प आधीच मार्गी लागले असते, तर स्वतंत्र विदर्भाची मागणी पुढे आली नसती, अशी पुस्तीही जोडली.
पुढील स्लाइड्सवर वाचा कन्हैय्याच्या बाबतीत काय म्हणाले आठवले...