आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आढाव्यासाठी पालक मंत्री जिल्हा कचेरीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यातील विकास कामे ठरलेल्या वेळेत पूर्ण होत आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी आज, शनिवारी थेट जिल्हा कचेरीत पोहचून अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पिक विमा योजना, जलयुक्त शिवार, कायदा सुव्यवस्था आणि शहरातील रस्ते आदी विषयांचा यामध्ये समावेश होता. 
 
जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पाण्डेय, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. राम मूर्ती, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, मनपा आयुक्त अजय लहाने, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र निकम यांची यावेळी उपस्थिती होती. पिक विम्या संबंधी शेतकऱ्यांची तक्रार येवू नये याची दक्षता घ्यावी, असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, तूर खरेदीचे पंचनामे जिल्हाधिकारी यांच्या निर्देशाप्रमाणे करावे. ही कार्यवाही काटेकोरपणे ३१ ऑगस्टपूर्वी पूर्ण करावी. कोणताही शेतकरी यापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हा परिषदेच्या काही शाळेच्या इमारतीची अवस्था चांगली नाही अशा शाळांचे निरीक्षण करुन वर्गवारी करावी. त्यांना दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी ग्वाहीही पालकमंत्री यांनी यावेळी दिली. 

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सुरु असलेल्या नवीन रस्त्यांची कामे दर्जेदार विहित मुदतीत पूर्ण करावीत, अशा सूचना बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण यांना दिल्या. शहरात सुरु असलेल्या कामांचाही आढावा यावेळी पालकमंत्री डॉ पाटील यांनी घेतला. त्यात पाणीपुरवठा, रस्ते, कापशी तलावाचे सौंदर्यीकरण, दलीत वस्तीतील सुधारणा आदींचा समावेश आहे. 

 
बातम्या आणखी आहेत...