आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेगाव: ट्रकवर दुचाकी धडकली; अपघातात एक जण ठार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेगाव-आनंदसागर समोर काही अंतरावर एका ट्रकवर दुचाकी मागून धडकल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज १६ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, मृतकाची दुचाकी वाशीम पासिंगची असून त्याचे दुचाकीवर जाधव असे लिहिलेले असल्याचे दिसून येत आहे. आनंदसागर समोर ट्रक क्रमांक एम. एच. १८/ एम/ ४४७८ ला दुचाकी क्रमांक एम. एच. ३७ / आर. / ८६४३ धडकल्याची घटना आज दुपारी घडली. अपघातानंतर नागरिकांनी या दुचाकीस्वारास शेगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल काकड यांनी दुचाकीस्वारास मृत घोषित केले. घटनेची फिर्याद डॉ. कोमल काकड यांच्यातर्फे कक्षसेवक प्रभाकर धनोकार यांनी शेगाव शहर पोलिस स्टेशनला दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास एपीआय किशोर तावडे हे करीत आहेत. 
बातम्या आणखी आहेत...