आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजी आमदार रावसाहेब आपोतीकर यांचे निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपातापा -  कोळी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक राजकीय नेते, एसटी महामंडळाचे माजी सदस्य, लोकप्रिय माजी आमदार रावसाहेब उर्फ माणिकराव आपोतीकर यांचे जानेवारीला सकाळी वाजता मुंबई येथे दीर्घ आजाराने निधन झाले. उद्या, जानेवारीला दुपारी १२ वाजता त्यांची बारुला विभागातील कर्मभूमी आपोती खुर्द, येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
 
बारुला विभागातील आपोती खुर्द येथील सामाजिक दानशूर,कर्मयोगी स्व. बाबासाहेब उर्फ रामचंद्र आपोतीकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र माजी आमदार रावसाहेब आपोतीकर यांच्यावर गत ४-५ महिन्यांपासून मुंबई येथे वैद्यकीय उपचार सुरू होते. ते उपचाराला साथ देत नसल्याने अखेर वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. 

सन १९७८ मध्ये बोरगावमंजू विधानसभा निवडणुकीमध्ये विदर्भातून सर्वाधिक २५ हजारपेक्षा जास्त मतांनी ते विजयी झाले होते. विशेष म्हणजे त्यावेळी सर्वात कमी वयाचे २६ वर्षीय आमदार ठरले होते. केवळ कमी वय असल्याने त्यावेळच्या शासनामध्ये मंत्री पद मिळाले नव्हते. परंतु, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सदस्य झाले. अखिल भारतीय कोळी समाज महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून १० वर्षे कार्यरत होते. तसेच अनेक पदांवर त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी पार पाडली होती. राजकीय क्षेत्रातील सर्व पक्ष सामाजिक संघटनांमध्ये आदर्श गणमान्य व्यक्तिमत्व म्हणून गणले जातात. नेहरू, गांधी घराणे, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील तसेच गणमान्य परिवारांशी त्यांची जवळीक होती. त्यांचे कार्य कालावधीमध्ये त्यांच्या कार्याची अविट छाप निर्माण झाली होती. त्यांचे विकासाभिमुख कार्य सर्वत्र चर्चिल्या जाते. 
बातम्या आणखी आहेत...