आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपला जातीयवादी म्हणणारे सत्तेत सहभागी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - कालपर्यंत भाजपला जातीयवादी म्हणणारे रामविलास पासवान यांच्यासारखे नेते अाज भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लाेकशाही अाघाडीच्या सरकारमध्ये मंत्री असून, अाज भाजपला काेणाीच अस्पृश्य नाही. याचे प्रतिबिंब राज्यात झालेल्या नगराध्यक्ष, नगरपालिका निवडणुकीच्या निकालात पाहावयास मिळाले असून, भाजपचे सर्वाधिक १२ नगराध्यक्ष दलित समाजातील असून, मुस्लिम नगरसेवकही निवडून अाले अाहेत, अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विराेधकांचा समाचार घेतला. ते शनिवारी भाजपच्या पश्चिम विदर्भ कार्यकर्ता संमेलनात बाेलत हाेते.
नगराध्यक्ष, नगर पालिका प्रभाग निवडणुकीमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर शनिवारी पहिलेच माेठे कार्यकर्ता संमेलन अायाेजित केले हाेते. संमेलनाला व्यासपीठावर खासदार संजय धाेत्रे, पालकमंत्री डाॅ. रणजित पाटील, प्रदेश सरचिटणीस रामदास अांबटकर, संघटनमंत्री रवी भुसारी, डाॅ. अामदार सुनील देशमुख, डाॅ. अामदार अनिल बाेंडे, अरुण अरसड, उपेंद्र काेठेकर, अामदार चैनसुख संचेती, अामदार प्रकाश भारसाकळे, अामदार हरीश पिंपळे, अामदार रणधीर सावरकर, अामदार लखन मलिक, अामदार संजय कुटे, महापौर उज्ज्वला देशमुख, स्थायी समितीचे सभापती विजय अग्रवाल ,डॉ. अशोक ओळंबे, आमदार राजेश नजरधने, आमदार राजू तोड्साम, आमदार अशोक उईके, आमदार संजीव रेड्डी, आमदार प्रभाकर भिलावेकर, शीलाताई खेडकर अादी प्रामुख्याने उपस्थित हाेते. प्रस्ताविक अकाेला महानगध्यक्ष किशाेर मांगटे यांनी केले. सूत्रसंचालन अामदार संजय कुटे यांनी केले.

निधीची कमतरता पडणार नाही: पालकमंत्री डॉ. पाटील : अाताकेंद्र, राज्य नगर पालिकेत भाजपची सत्ता असल्याने विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री तथा नगर विकास राज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील यांनी केली. प्रत्येक याेजनेचा लाभ लाभार्थींपर्यंत पाेहाेचण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. नगर पालिका पदाधिकाऱ्यांनी विकासाबाबत प्रस्ताव सादर केल्यास ताे तातडीने मंजूर करण्यात येईल. मात्र, हा प्रस्ताव अभ्यासपूर्ण सादर करावा, असेही पालकंमत्री म्हणाले. अभ्यासपूर्ण प्रस्ताव तळमळीसाठी पालकमंत्र्यांनी माेर्शीचे अामदार डाॅ. अनिल बाेेंडे यांच्या नावाचा अावर्जून उल्लेख केला.
नेत्यांनीटाेचले कान : प्रदेशसरचिटणीस रामदास अांबटकर यांनी नगराध्यक्ष, नगर पालिका प्रभाग निवडणुकीतील एबी फाॅर्ममध्ये गाेंधळ झाल्याचे सांगितले. काही ठिकाणी संचलन समिती निष्क्रिय हाेत्या. काही ठिकाणच्या समित्यांना स्थानिकस्तरावर विश्वासात घेण्यात अाले नाही. त्यामुळे यानंतरच्या निवडणुकीत असे प्रकार घडण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे अावाहनही त्यांनी केले. त्यानंतर उपेंद्र काेठीकर यांनीही अागामी पदवीधर, जिल्हा परिषद मनपा निवडणुकीत प्रचार जनसंपर्क कसा करायचा, यावर मार्गदर्शन केले.
बातम्या आणखी आहेत...