आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डंपिंगग्राउंडवर कचरा वेचणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, आरोपीस अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- डंपिंग ग्राउंडवर कचरा वेचणाऱ्या १४ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून अकोटफैल पोलिसांनी २० वर्षीय युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. 

नायगाव येथील डंपिंग ग्राउंडवर कचरा वेचणाऱ्या मुलीसोबत नायगाव येथील शेख नासीर शेख कालू याची वर्षभरापासून ओळख होती. तेव्हापासून तो तिच्याशी लगट करत आहे. विशेष म्हणजे त्याचे लग्न झाले आहे. त्याची पत्नी माहेरी गेल्याने तो एकटाच घरी होता. त्याचा फायदा घेत त्याने १७ तारखेला या मुलीला घरी आणले तिच्यावर बलात्कार केला. त्याने तीन दिवस या मुलीवर अत्याचार केले. सोमवारी पत्नी घरी अाली तेव्हा सदर मुलगी तिला घरीच दिसून आली. त्यामुळे त्याचे पत्नीसोबत भांडण झाले. यावेळी मुलीने शेख नासीर याच्याशी लग्नाची गळ घातली. हाणामारीचे प्रकरण पोलिसात पोहोचले. ठाणेदार तिरुपती राणे यांनी सखोल चौकशी केली असता त्यांनी आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भादंवी ३७६, पोस्को ३,४ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपीला मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...