आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपी गजाआड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपीला अकोटफैल पोलिसांनी बोरगावमंजू येथून अटक केली आहे. घटनेपासून आरोपी फरार होता. पाचमोरी येथील १७ वर्षीय युवती एका महाविद्यालयात शिकत होती. या वेळी मुलीने तिच्या काकाला मोबाइलद्वारे फोन केला. मात्र, तो राँग नंबर एका युवकाला लागला होता. तेव्हापासून या युवतीची ओळख त्या युवकासोबत झाली. त्यांच्यात नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर या मुलीला गर्भधारणा झाली होती. या प्रकरणाची भनक युवतीच्या भावाला लागल्यामुळे त्याने बोरगावमंजू येथील नितेश उर्फ विवेक बाळू सरकटेविरुद्ध अकोटफैल पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.

पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध भादंवि ३७६, पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार होता. पोलिस उपनिरीक्षक डिगांबर शिंपी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी बोरगावमंजू येथून आरोपीला अटक केली. ही कारवाई दिनकर गुर्दे, अश्विन सिरसाट, अमर इंगळे, सुरेश वाघ, रवी गिऱ्हे यांनी केली.