आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन बुलडाण्यामध्ये

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा- ‘पाचवे विदर्भस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन पंकज लद्दड इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट स्टडीज येथे २६ नोव्हेंबरला होणाऱ्या या साहित्य संमेलनात राष्ट्रसंतांच्या विचारांचे मंथन होणार आहे,’ अशी माहिती भारतीय विचार मंचाचे विदर्भ प्रांत संयोजक सुभाष लोहे यांनी आज १९ नोव्हेंबरला शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 


प्रबोधनाच्या या उपक्रमात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे साहित्यावर आधारीत विदर्भस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन गेल्या चार वर्षापासून सुरु आहे. यावर्षीचे हे पाचवे संमेलन आयोजित केले आहे. देवभक्ती, अध्यात्म हा भारतीय समाजाचा स्थायी भाव आहे. वंदनीय राष्ट्रसंतांच्या साहित्यात देवभक्ती, अध्यात्म यातुन माणसाला देशभक्तीकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे. देवभक्ती, समाजभक्ती राष्ट्रभक्तीचा समन्वय या साहित्यात बघावयास मिळतो. यावर चिंतन-मंथन व्हावे या उद्देशाने संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी वारी भैरवगड येथील ज्ञानेश संस्थानचे प्रमुख ज्ञानेश्वर महाराज वाघ हे राहणार आहेत. तर उद्घाटक म्हणुन प्र-कुलगुरू राजेश जयपुरकर राहतील. 


संमेलनाचे स्वागताध्यक्ष खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष आशिष चौबीसा आहेत. विशेष अतिथी म्हणुन गुरुकुंज आश्रमाचे अ. भा. सरचिटणीस जनार्दन पंत बोथे नांदुरा आश्रमाचे आचार्य हरिभाऊ वेरुळकर उपस्थित राहतील. समारोपीय भाषण अमरावतीचे प्राचार्य अरविंदराव देशमुख यांचे होणार आहे. या संमेलनात सकाळी वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. त्यानंतर सकाळी वाजता प्रतिनिधी नोंदणी, चहा नास्ता, ९.३० वाजता प्रदर्शन उद्घाटन, तर १०.३० वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. सायंकाळी समारोप समारंभ होईल. बुलडाणा, अकोला, वाशीम जिल्ह्यातील प्रबोधन करणारे विद्वतजन, शिक्षण संस्थांचे संचालक, प्राध्यापक, अध्यापक, सामाजिक, राजकीय धार्मिक क्षेत्रातील नेतृत्व, कार्यकत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष आशिष चौबिसा, इंस्टिट्यूटचे अध्यक्ष डॉ. दीपक लद्दड, संमेलनाचे संयोजक रवींद्र लद्दड,प्रविण चिंचोळकर यांनी केले. 


संमेलनाचीव्यवस्था: संमेलनाचीव्यवस्था प्राचार्य प्रदीप जावंधिया यांचे नेतृत्वात प्राध्यापक वर्ग भारतीय विचार मंचाचे सर्व कार्यकर्ते सांभाळत आहेत. तर बुलडाणा शहरातील बस स्थानक, स्टेट बँक चौक सह इतर ठिकाणा वरुन संमेलनस्थळी जाण्यासाठी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. 


बुलडाणा येथे होणाऱ्या पाचव्या विदर्भस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाविषयी सुभाष लोहे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. 


मान्यवरांचे विविध विषयांवर परिसंवाद 
वंदनीय राष्ट्रसंतांच्या साहित्यातील अध्यात्मबोध राष्ट्रबोध या दोन विषयावरील परिसंवादाचे अध्यक्ष प्राचार्य शांताराम बुटे, डॉ. राजेंद्र नाईकवाडे हे राहणार आहे. तर उपविषयांवर डॉ. विकास बाहेकर बुलडाणा, प्रा. मोरेश्वर देशमुख आष्टी, अरुण नेटके संघटन मंत्री विहिंप विदर्भ, प्रा. राजीव बोरकर अकोला, प्रा. गजानन वाघ वाशीम सुश्री अरुंधती कावडकर चंद्रपूर हे विषय प्रतिपादन करतील.

बातम्या आणखी आहेत...