आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीत गटबाजीचा केविलवाणा प्रयत्न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - आतापर्यंत गटबाजी पासून अलिप्त असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेस मध्येही गटबाजीला प्रारंभ झाला आहे. काही माजी पदाधिकारी मोजक्या कार्यकर्त्याच्या मदतीने वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारीचा पाढा वाचत असून थेट जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्ष बदलण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु अद्याप या तक्रारीची दखल वरिष्ठ नेत्यांनी घेतलेली नाही. विशेष म्हणजे महापालिका निवडणुका तोंडावर आल्या असताना आणि कॉग्रेससह विविध पक्षाचे नगरसेवक राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वाटेवर असताना हा प्रकार कशासाठी? असा प्रश्न राष्ट्रवादी कॉग्रेसच्या तळातल्या कार्यकर्त्यापुढे निर्माण झाला आहे.
होऊ घातलेली महापालिकेची निवडणुक राष्ट्रवादी कॉग्रेसला ताकद सिद्ध करण्याची भरपुर संधी देणारी आहे. कॉग्रेससह विविध पक्षातील नगरसेवक तसेच कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश घेणार आहेत. त्यामुळे यावेळी कॉग्रेस पेक्षा राष्ट्रवादी कॉग्रेसचे महापालिकेतील संख्याबळ वाढण्याची दाट शक्यता राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी कॉग्रेसला असे पुरक वातावरण असताना पक्षातील माजी पदाधिकाऱ्यांनी स्वत:च्या पक्षातील नेत्यांविरुद्ध तक्रारी करुन नेमके काय साध्य करायचे आहे? अशी चर्चा राष्ट्रवादी कॉग्रेस मधील कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे. या प्रकारामुळेच या गटबाजीला प्रारंभ झाला असला तरी प्रतिसाद मात्र नगण्य आहे.

राष्ट्रवादी कॉग्रेसची ताकद शहरात यापूर्वीही फारशी नव्हती. २००२ च्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसला केवळ तीन जागा जिंकता आल्या. तर २००७ च्या निवडणुकीत हा आकडा वॉर्ड पद्धतीनुसार निवडणुका झाल्याने ११ वर पोचला. मात्र २०१२ च्या निवडणुकीत पुन्हा घसरगुंडी होऊन राष्ट्रवादी कॉग्रेसचे केवळ पाच नगरसेवक निवडुन आले. राष्ट्रवादी कॉग्रेसने मागच्या निवडणुकीत सर्व जातीच्या कार्यकर्त्यांना संधी दिली. मात्र मराठा समाजाने या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉग्रेसकडे पाठ फिरवली होती. जे पाच नगरसेवक निवडुन आले. त्यात मराठा समाजाच्या मतदानावर केवळ एक नगरसेवक निवडुन आला. तर उर्वरित चार नगरसेवकांच्या प्रभागात मराठा समाजाची मते नगण्य होती. यामुळेच पक्षाचे वरिष्ठ नेते स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराज आहेत. त्यामुळेच या तक्रारीची दखल वरिष्ठ नेत्यांनी अद्याप घेतली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली.
बातम्या आणखी आहेत...