आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rate Of Population Growth10 Per Cent Decline In Akola

लोकसंख्या वाढीच्या दरामध्ये १० टक्क्यांनी घट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोला जिल्ह्याचा १९९१ ते २००१ या दहा वर्षांच्या कालावधीत लोकसंख्या वाढीचा दर २०.२५ एवढा होता. २००१ ते २०११ या कालावधीत हा दर ११.६० एवढा झाला आहे. याशिवाय आरोग्य विभागाने राबवलेल्या विविध मोहिमेमुळे मुलीच्या जन्माचेही प्रमाण निश्चित वाढलेले दिसून येते. ही आनंदाची बातमी आहे. लोकसंख्या वाढीचा दर घटणे, हे विकासाचे द्योतक असल्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांनी सांगितले.

११ जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जात आहे. त्यानिमित्त आरोग्य उपसंचालक कार्यालयातर्फे आयोजित पत्रकार परिषदेत उपसंचालक डॉ. लव्हाळे यांनी अकोल्यासह अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील लोकसंख्या वाढीच्या दरावर प्रकाश टाकला.

२०११ ते २०१५ या पाच वर्षांतील जन्माचे प्रमाण लक्षात घेता यातून ब-यापैकी आपण लोकसंख्येवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होऊ शकलो. २००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा लिंगदर ९२२ होता, तर २०११ नुसार तो ९२५ झाला आहे. अमरावती विभागातील बुलडाणा आणि वाशीम या जिल्ह्यांचा लिंगदर चिंताजनक आहे. लिंगदर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत आरोग्य संस्थांची नियमित तपासणी, नियमबाह्य गर्भपाताच्या गोळ्यांवर नियंत्रण ठेवणे, शहरी तसेच ग्रामीण भागात मुलगा-मुलगी लिंगभेदाविषयी समुपदेशन जनजागृती केल्या जात आहे. यामुळे ब-यापैकी नियमबाह्य गर्भपातावर नियंत्रण ठेवण्यात प्रशासन यशस्वी झाले आहे.
^११ ते २४ जुलैदरम्यान लोकसंख्या स्थिरता पंधरवडा राबवला जात आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील एनजीओसह नागरिकांनी सहभागी व्हावे.'' डॉ.अविनाश लव्हाळे, उपसंचालक अारोग्य
दृष्टिक्षेपात लोकसंख्येची घनता

- जिल्हा२००१ २०११
- अकोला ३०० ३२१
- अमरावती ९३८ २३७
- बुलडाणा २३० २६८
- वाशीम १९८ २४४
- यवतमाळ १८१ २०४