आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचकांकडून ‘बिल्डिंग अकोला’चे कौतुक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- अकोलानगरीत वाचकांच्या "प्रेम'बळावर दैनिक ‘दिव्य मराठी’ने आपली दोन वर्षे पूर्ण करीत तिसऱ्या वर्षांमध्ये पदार्पण केले. अकोलेकरांची मर्जी जाणून घेत ‘अकोला २०२०’ हा सहा वर्षांनंतरचा विकास रेखाटत विकासमार्गावर सुरू झालेला प्रवास ‘बिल्डिंग अकोला’पर्यंत येऊन पोहोचला. या प्रवासात सहप्रवासी बनलेल्या अकोलेकरांनी १४ जुलैला द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘बिल्डिंग अकोला’ पुरवणीचे भरभरून कौतुक केले. अकोल्याच्या विकासात महत्त्वाच्या ठरणाऱ्या बाबी, त्यातील प्रमुख अडसर अन् त्यातून निघणारी वाट, असा धांडोळा या पुरवणीने घेतला. कला, क्रीडा, आरोग्य, प्रशासन, शिक्षण, साहित्य, अध्यात्म, कृषी, राजकारण, विज्ञान-तंत्रज्ञान, महिला-युवक, बाल कामगार, अशा सर्व क्षेत्रांच्या भविष्याचा वेध घेत वाचकांसमोर आलेल्या ‘बिल्डिंग अकोला’ने वाचकांची मने जिंकली. तो आनंद त्यांनी दूरध्वनी, शुभेच्छापत्रे, पुष्पगुच्छांच्या माध्यमातून, तर काहींनी थेट भेट घेऊन दैनिक दिव्य मराठीकडे व्यक्त केला. सकाळपासून विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी ‘बिल्डिंग अकोला’ पुरवणी दिव्य मराठीच्या सकारात्मक भूमिकेचे कौतुक केले. तसेच या प्रवासात अकोला बिल्डिंगसाठी आम्ही आपल्यासोबत असल्याची ग्वाही दिली. दैनिक दिव्य मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त १४ जुलैला ही पुरवणी प्रकाशित करण्यात आली, तरी मान्यवरांसाठीचा "स्नेहमिलन सोहळा' येत्या २५ जुलैला वाचक, विक्रेते, जाहिरातदारांसह तमाम अकोलेकरांच्या साक्षीने श्रीराजराजेश्वर नगरीत साजरा होणार आहे.